ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाने लिहिली खास पोस्ट, रोमाँटिक फोटो शेअर करत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 02:43 PM2023-11-11T14:43:48+5:302023-11-11T15:56:11+5:30

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना मराठी सिनेसृष्टीतील ते क्यूट कपलपैकी एक आहेत.

Actor rishi saxenas special post on her girlfriend and actress isha keskars birthday | ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाने लिहिली खास पोस्ट, रोमाँटिक फोटो शेअर करत म्हणाला...

ईशा केसकरच्या वाढदिवसानिमित्त बॉयफ्रेंड ऋषी सक्सेनाने लिहिली खास पोस्ट, रोमाँटिक फोटो शेअर करत म्हणाला...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर (Isha Keskar). 'जय मल्हार'च्या माध्यमातून ईशा घराघरात पोहोचली. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने सिनेइंडस्ट्रीत तिचे हक्काचे स्थान निर्माण केले. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना गेल्या अनेकवर्षांपासून एकमेकांना डेट करतायेत.  मराठी सिनेसृष्टीतील ते क्यूट कपलपैकी एक आहेत. दोघे सोशल मीडियावरही खूप लोकप्रिय आहेत. आज ईशाच्या वाढदिवसानिमित्त ऋषीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. 


ऋषीने पोस्ट शेअर करताना ईशाचे सोबतचे रोमाँटिक आणि क्युट फोटो शेअर केले आहेत. ऋषी लिहितो, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला शांती आणि स्थिरता लाभू देत. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ऋषीच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट करत ईशाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

दरम्यान ईशा केसकर आणि ऋषी सक्सेना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहतात. २०१८ मध्ये, इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ईशासोबतचा फोटो पोस्ट करत ऋषीने रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ईशा व ऋषी यांची पहिली भेट झाली होती. या पहिल्याच भेटीत ऋषीच्या शांत स्वभावावर ईशा भाळली होती. अर्थात पहिल्या भेटीत काहीही बोलणं झालं नव्हतं. यानंतर झी मराठी पुरस्कारांच्या निमित्ताने ईशा व ऋषी यांचं बोलणं सुरू झालं आणि ईशानेच ऋषीला कॉफीसाठी विचारलं. पुढे मैत्री बहरली आणि एकदिवस ही मैत्री प्रेमाच्या कबुलीपर्यंत आली. दोघे लग्न कधी करणार हा प्रश्न चाहते त्यांनी नेहमीच विचारत असतात. 


 

Web Title: Actor rishi saxenas special post on her girlfriend and actress isha keskars birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.