हा अभिनेता करतोय छोट्या पडद्यावर पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 11:10 AM2018-07-18T11:10:44+5:302018-07-18T11:15:13+5:30

तब्बल दोन वर्षांनंतर सुबोध भावे छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे.

The actor is returning to the small screen | हा अभिनेता करतोय छोट्या पडद्यावर पुनरागमन

हा अभिनेता करतोय छोट्या पडद्यावर पुनरागमन

googlenewsNext
ठळक मुद्दे 'तुला पाहते रे'मध्ये सुबोध भावे विक्रम सरंजामेची भूमिका साकारणार आहे.गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे.


'का रे दुरावा' मालिकेला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेतील अविनाश देव या भूमिकेतून सुबोध भावेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. बाहेरून स्वभावाने कडक पण अगदी हळव्या मनाचा बॉस अविनाश देव म्हणजे अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे.

तब्बल दोन वर्षांनंतर सुबोध मालिकेत दिसणार आहे. या मालिकेचे नाव 'तुला पाहते रे' असे असून या मालिकेद्वारे सुबोध छोट्या पडद्यावर पुनरागमन करतो आहे. ही मालिका आहे इशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतून गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करते आहे. या मालिकेतील इतर कलाकार व आणखी माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. तसेच आणखीन एक नवोदित अभिनेत्री या मालिकेत दिसणार असल्याचेही समजते आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये सुबोध भावेने उत्तमोत्तम चित्रपट करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आता तो छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. 'तुला पाहते रे' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून आता पुन्हा सुबोध भावेला अविनाश देव नंतर विक्रम सरंजामे ही विविध पैलू असलेली भूमिका साकारताना छोट्या पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे. ही मालिका लवकरच झी मराठी या वाहिनीवर दाखल होणार आहे.

Web Title: The actor is returning to the small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.