अभिनेत्री ओजस्वी अरोराला अभिनय नाहीतर या गोष्टीत होता रस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:44 IST2017-10-24T10:14:03+5:302017-10-24T15:44:03+5:30

ओजस्वी अरोरा कॉमेडी सिटकॉम क्या हाल मि.पांचालमधील सुंदर बहूची भूमिका साकारत आहे.ओजस्वी अरोरा एका मेहनती अभिनेत्रीसोबत एक उत्तम  डान्सरसद्धा ...

Actor Ojshi Arora is acting or else she was interested in this? | अभिनेत्री ओजस्वी अरोराला अभिनय नाहीतर या गोष्टीत होता रस?

अभिनेत्री ओजस्वी अरोराला अभिनय नाहीतर या गोष्टीत होता रस?

स्वी अरोरा कॉमेडी सिटकॉम क्या हाल मि.पांचालमधील सुंदर बहूची भूमिका साकारत आहे.ओजस्वी अरोरा एका मेहनती अभिनेत्रीसोबत एक उत्तम  डान्सरसद्धा आहे.तिच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले की ओजस्वी कथ्थक, मयुरभंज  आणि कॉन्टेम्पररी डान्सिंगचे रितसद ट्रेनिंग घेतले आहे.लहानपणापासूनच तिला डान्सची आवड होती आणि मग तिने त्यात प्रावीण्य मिळवले. ती ज्या कोणत्या कार्यक्रमात जाते तिथे  गाणं ऐकु येताच ती प्रथम नृत्य करायला सुरूवात करायची. मुळात अभिनेत्री बनण्याआधी तिची स्वतःचे डान्स क्लासेसदेखील होते. त्याच्या माध्यमातून तिने मकाऊ,सिडनी,मेलबर्न,श्रीलंका,स्पेन अशा अनेक ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्समध्येही परफॉर्म केले आहे.याबद्दल ओजस्वी म्हणाली,“मला डान्स करायला आवडते आणि मी कथ्थक  आणि अन्य नृत्य प्रकारांमध्ये विशारद आहे. मी डान्स स्पर्धांमध्ये अनेक स्कॉलरशिप्स मिळवल्या असून जर मला अभिनयाची ऑफर आली नसती तर मी कदाचित डान्सिंग रिॲलिटी शोजमध्ये ऑडिशन देताना झळकली असती.मुळात अभिनय नाहीतर  डान्स हे माझे पहिले प्रेम आहे असे तिने सांगितले.

ओजस्वी ही श्रीदेवीची मोठी चाहती असून ती तिचा एकही चित्रपट पाहण्याचे  ती चुकवत नाही.पूर्वी ती श्रीदेवीचे चित्रपट पाहून त्यातील प्रसंग स्वत: साकार करायची. तसेच श्रीदेवीच्या चेह-यावरील बोलके एक्सप्रेशन टिपून घेत. तिने श्रीदेवीप्रमाणेच शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतले असून ती कथ्थक, मयूरभंज छाव आणि आधुनिक नृत्यांत पारंगत आहे. ती सेटवरही याबद्दल वारंवार चर्चा करताना दिसते. श्रीदेवी आणि ओजस्वी यांच्यात आणखी एक साम्य आहे; ते म्हणजे ओजस्वीलाही श्रीदेवीप्रमाणेच मोठे डोळे आहे.त्याद्वारे ती मालिकेतील परी या व्यक्तिरेखेचा खट्याळपणा आणि प्रेम व्यक्त करते.तिच्या श्रीदेवीप्रेमाबद्दल ओजस्वीला विचारले असता ती म्हणाली, “श्रीदेवी ही माझी आदर्श आहे. त्याची कारणंही बरीच आहेत. मी तिचा एकही चित्रपट पाहण्याचं सोडत नाही. सूक्ष्मपणे निरीक्षण करते आणि स्वत: त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते. तिच्याबरोबरर एकत्र काम करणं हे माझं स्वप्न असून मला तिची भेट घेण्याची तीव्र इच्छा आहे.”

Web Title: Actor Ojshi Arora is acting or else she was interested in this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.