रातोरात डील फायनल झाली अन् जय भानुशालीची ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री झाली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 10:26 AM2021-10-01T10:26:07+5:302021-10-01T10:28:49+5:30

Bigg Boss 15 च्या घरात 16वा स्पर्धक ठरला जय भानुशाली

Actor Jay Bhanushali Surprising Entry In Salman Khan Bigg Boss 15 | रातोरात डील फायनल झाली अन् जय भानुशालीची ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री झाली...!!

रातोरात डील फायनल झाली अन् जय भानुशालीची ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री झाली...!!

googlenewsNext
ठळक मुद्देजय भानुशाली टेलिव्हिजन दुनियेतील लोकप्रिय  चेहरा आहे.  एक अभिनेता तर शिवाय एक लोकप्रिय होस्ट अशी त्याची ओळख आहे.

बिग बॉस 15’ उद्यापासून आपल्या भेटीस येत आहे. उद्या ‘बिग बॉस 15’चा (Bigg Boss 15) ग्रँड प्रीमिअर रंगणार आहे. उद्याच्या प्रीमिअरमध्ये ‘बिग बॉस 15’च्या स्पर्धकांची तोंडओळख होईलच. पण त्यापूर्वी घरात एन्ट्री घेणा-या स्पर्धकांच्या (Bigg Boss 15 Contestants)  नावाचा खुलासा झाला आहे. तूर्तास एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे, जय भानुशाली. होय, ऐनवेळी जय भानुशालीला ‘बिग बॉस 15’चा 16 वा स्पर्धक  (Jay Bhanushali in Bigg Boss 15) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
स्पर्धकांची घरामध्ये एन्ट्री होणार होती त्याच्या एक दिवस आधी जय भानुशालीसोबत डील झाल्याचे मेकर्सनी म्हटले आहे.  जय भानुशाली याआधी बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून दिसलेला आहे. आता तो स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री घेतोय.

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जय भानुशालीला मेकर्सनी अगदी रातोरात साईन केले. एका सूत्रांनी सांगितले की, ‘बिग बॉस 15’साठी काही लोकप्रिय टीव्ही कलाकारांचा आम्हाला शोध होता. ऐनवेळी जय भानुशालीसोबत डिल फायनल झाली.

जय भानुशाली टेलिव्हिजन दुनियेतील लोकप्रिय  चेहरा आहे.  एक अभिनेता तर शिवाय एक लोकप्रिय होस्ट अशी त्याची ओळख आहे. जयने ‘धूम मचाओ धूम’ या शोद्वारे टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. पण त्याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो एकता कपूरच्या ‘कयामत’ या मालिकेमुळे. या मालिकेत त्याने नीव शेरगिलची भूमिका चांगलीच गाजली होती.  यानंतर कुमकुम, कसौटी जिंदगी कि, किस डेस मी है मेरा दिल यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केले.  झलक दिखला जा, कौन जितेगा बॉलिवूड का टिकट, इस जंगल से मुझे बचाओ आणि खतरों के खिलाडी यांसारख्या रिएलिटी शोमध्येही तो सहभागी झाला. जय भानुशालीने डान्स इंडियासारखे डान्स शो आणि इंडियन आयडॉलसारखे सिंगिंग शो होस्ट केले आहेत.   बॉलिवूडमध्येही त्याने त्याचे नशीब आजमावले. हेट स्टोरी आणि एक पहेली लीला यासारख्या चित्रपटांत तो दिसला.

यावेळी बिग बॉसमध्ये अनेकप्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत. करण कुंद्रा, सिंबा नागपाल, उमर रियाज, ईशान सेहगल, विशाल कोतिया, तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह,अफसाना खान, विधि पांड्या, डोनल बिष्ट, साहिल श्रॉफ आणि मीशा अय्यर तसेच शमिता शेट्टी, प्रतीक सहेजपाल, निशांत भट्ट यांचासुद्धा स्पर्धक म्हणून सहभाग होणार आहे.

Web Title: Actor Jay Bhanushali Surprising Entry In Salman Khan Bigg Boss 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.