अनस रशिदबरोबर होणा-या तुलनेने अभिनेता अविनेश रेखी वैतागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 15:56 IST2017-04-12T10:26:22+5:302017-04-12T15:56:22+5:30

सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’चा पुढील भाग असलेल्या ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये अविनेश रेखी हा अभिनेता ...

Actor Avishanche Rakhi VaTagala, who is an actor with Anas Rashid | अनस रशिदबरोबर होणा-या तुलनेने अभिनेता अविनेश रेखी वैतागला

अनस रशिदबरोबर होणा-या तुलनेने अभिनेता अविनेश रेखी वैतागला

्वाधिक लोकप्रिय मालिका ‘दिया और बाती हम’चा पुढील भाग असलेल्या ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’मध्ये अविनेश रेखी हा अभिनेता उमाशंकर ही नायकाची भूमिका साकारीत आहे. नव्या मालिकेकडूनही पूर्वीच्या मालिकेइतक्याच उच्च अपेक्षा ठेवण्यात आल्या आहेत. परंतु ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ची कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल,याबद्दल अविनेशला खात्री आहे.'दिया और बाती…’मधील सूरज आणि संध्या (अनुक्रमे अनास रशीद आणि दीपिका सिंह) ही जोडी प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतून बसली आहे. त्यातील सूरजची व्यक्तिरेखा प्रेक्षकांमध्ये विलक्षण लोकप्रिय झाली होती. त्यामुळे सूरज साकारणा-या अनास रशीदबरोबर आपली तुलना होत असल्याबद्दल अविनेशकडे विचारणा केली असता तो म्हणाला,“अशा तुलनांचा माझ्यावर काही परिणाम होत नाही. माझ्या दृष्टीने उमाशंकर ही नवी व्यक्तिरेखा असून ‘तू सूरज, मैं साँझ पियाजी’ ही नवी मालिका आहे, जिने तिच्या मूळ मालिकेचा काही अंश आपल्याबरोबर घेतला आहे. पहिल्या मालिकेने आपलं काम चोख बजावून स्वत:चा स्वतंत्र चाहता प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता आणि आता या उंचावलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आहे.” ‘तू सूरज,मैं साँझ पियाजी’ मालिकेत उमाशंकरची (अविनेश) प्रेयसी कनक राठी (रिहा शर्मा) असून ती सूरज व संध्या यांची मुलगी आहे.'दिया और बाती' या मालिकेनं पाच वर्ष रसिकांचं मनोरंजन केलंय.रसिकांनीही या मालिकेवर आणि मालिकेतल्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलंय. विशेष म्हणजे अभिनेता अनस रशिदने साकारलेली सूरज ही भूमिका आजही रसिक विसरलेले नाहीयेत.मालिकेत संध्या आणि सूरजमधल्या रोमँटीक केमिस्ट्रीमुळेच या मालिकेने रसिकांचे मनं जिकण्यात यशस्वी ठरली होती. 

Web Title: Actor Avishanche Rakhi VaTagala, who is an actor with Anas Rashid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.