​नामकरणच्या सेटवर अपघात... रिमा लागू थोडक्यात वाचल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 15:21 IST2016-10-25T15:21:07+5:302016-10-25T15:21:07+5:30

नामकरण या मालिकेला सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत चांगलीच चर्चा आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात ...

Accidents on the set of naming ... Read the Rima applicable briefly | ​नामकरणच्या सेटवर अपघात... रिमा लागू थोडक्यात वाचल्या

​नामकरणच्या सेटवर अपघात... रिमा लागू थोडक्यात वाचल्या

मकरण या मालिकेला सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत चांगलीच चर्चा आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी सध्या या मालिकेची टीम खूप प्रयत्न करत आहे. या मालिकेत रिमा लागू, बरखा बिष्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेच्या कथानकाला आता एक कलाटणी मिळणार आहे. या मालिकेत दयवंती मेहता स्वतःला पेटवून घेणार आहे. या दृश्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. पण या चित्रीकरणाच्यावेळी एक अपघात झाला आणि त्यातून रिमा लागू थोडक्यात वाचल्या. ठरल्याप्रमाणे मालिकेचे चित्रीकरण अतिशय व्यवस्थितपणे सुरू होते. पण कोणाला काही कळायच्याआधीच रिमा लागू यांच्या साडीने पेट घेतला. क्षणातच आगीच्या ज्वाळांमध्ये रिमा लागू अडकल्या. त्या खूपच घाबरल्या होत्या. काय करायचे हे कळत नसल्याने त्यांनी हातानेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. सेटवर असलेल्या सगळ्यांनी मिळून ही आग लगेचच विझवली. पण यामध्ये त्यांची बोटे भाजली. यानंतर त्यांना लगेचच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. रिमा यांनी घरी जाऊन आराम करावा असे सगळ्यांचे म्हणणे होते. पण या अपघाताचा चित्रीकरणावर परिणाम होऊ नये असे त्यांचे म्हणणे असल्याने त्यांनी त्या स्थितीतदेखील चित्रीकरण पूर्ण केले. याविषयी रिमा सांगतात, "माझी साडी सुतीची असल्याने तिने लगेचच पेट घेतला. मी खूप घाबरली असल्याने मी हातानेच आग विझवली. त्यात माझी बोटे भाजली. सुदैवाने जखम खोल नसल्याने काहीच दिवसांत माझी बोटे बरी होतील."




Web Title: Accidents on the set of naming ... Read the Rima applicable briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.