'अबोली'ने गाठला १०० भागांचा टप्पा, या अभिनेत्याची होणार धमाकेदार एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:15 AM2022-03-19T11:15:09+5:302022-03-19T11:15:34+5:30

Aboli Serial: 'अबोली' मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

'Aboli' serial has reached the stage of 100 episodes, this actor will have a banging entry | 'अबोली'ने गाठला १०० भागांचा टप्पा, या अभिनेत्याची होणार धमाकेदार एन्ट्री

'अबोली'ने गाठला १०० भागांचा टप्पा, या अभिनेत्याची होणार धमाकेदार एन्ट्री

googlenewsNext

स्टार प्रवाहवरील 'अबोली' (Aboli Serial) मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळते आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे मालिकेने नुकताच १०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. मालिकेचा यापुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असेल. दरम्यान या मालिकेत एका सुप्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. 

अबोली मालिकेत सध्या अबोलीच्या आयुष्यात बरीच उलथापालथ सुरू आहे. प्रतापरावांकडून झालेल्या अपमानानंतर अंकुशने अबोलीला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला आहे. राहायला कुठेच आसरा नसल्यामुळे अबोलीने मंदिरात राहण्याचे ठरवले आहे. अश्यातच मालिकेत डीसीपी किरण कुलकर्णी यांची एन्ट्री होणार आहे. अबोलीला पुन्हा अंकुशच्या घरात प्रवेश मिळावा यासाठी किरण कुलकर्णी प्रयत्न करतील का हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

सुप्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर (Uday Tikekar) किरण कुलकर्णी हे पात्र साकारणार आहेत. या पात्रविषयी सांगताना उदय टिकेकर म्हणाले, 'स्टार प्रवाहसोबत माझं खूप जुनं नातं आहे अगदी अग्निहोत्र पासून. अबोली मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा योग जुळून आला आहे. किरण कुलकर्णी हे पात्र अतिशय संवेदनशील आणि प्रेमळ आहे. त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं काय घडणार याचा उलगडा होईलच पण हे पात्र प्रेक्षकांना आवडेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी पाहायला विसरू नका अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.'

Web Title: 'Aboli' serial has reached the stage of 100 episodes, this actor will have a banging entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.