अमिताभ बच्चनसोबत अभिषेक बच्चनही दिसणार कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 12:46 IST2017-08-31T07:16:10+5:302017-08-31T12:46:10+5:30
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आजवरच्या सगळ्या सिझनप्रमाणेच या सिझनला देखील प्रेक्षकांचा ...
.jpg)
अमिताभ बच्चनसोबत अभिषेक बच्चनही दिसणार कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात
क न बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा नववा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आजवरच्या सगळ्या सिझनप्रमाणेच या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमातील अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन प्रेक्षकांना खूप आवडते. अमिताभ यांचे स्पर्धकांसोबतचे बोलणे, त्यांच्याशी अतिशय आदराने वागणे या गोष्टींचे नेहमीच कौतुक केले जाते. अमिताभ यांच्याशिवाय या कार्यक्रमाचा कोणी विचारदेखील करू शकत नाही. अमिताभ यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. यंदाच्या सिझनमध्ये प्रेक्षकांना अमिताभ यांच्यासोबत अभिषेक बच्चनला देखील पाहाता येणार आहे.
अभिषेक या कार्यक्रमाचा भाग बनणार आहे हे ऐकल्यावर अमिताभ यांच्यासोबत तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत झळकणार का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण असे नाहीये अभिषेक सूत्रसंचालन करणार नसून तो या कार्यक्रमात एक स्पर्धक म्हणून हजेरी लावणार आहे, कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अनेकवेळा सेलिब्रिटी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. आता अभिषेक देखील प्रमोशनसाठीच या कार्यक्रमात येणार आहे. पण तो कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नाही तर जयपूर पिंक पँथर या त्याच्या कबड्डीच्या टीमसाठी उपस्थित राहाणार आहे. तो त्याच्या कबड्डीच्या टीमसोबत या कार्यक्रमात येणार असून हॉट सीटवर बसणार आहे आणि अमिताभ यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे.
कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या या खास भागाचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. या चित्रीकरणाच्यावेळी अमिताभ आणि अभिषेक यांनी खूप सारी धमाल मस्ती केली असे म्हटले जात आहे.
Also Read : नागराज मंजुळेच्या चित्रपटात अमिताभ बच्चन साकारणार नागपूरच्या ‘या’ व्यक्तीची भूमिका !