'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 04:59 PM2024-05-01T16:59:25+5:302024-05-01T17:00:08+5:30

Abeer Gulal Serial : 'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन येत आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलीज झाला आहे.

'Abeer Gulal' to hit the screens soon, starring Gayatri Datar and Payal Jadhav in lead roles | 'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत

'अबीर गुलाल' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, गायत्री दातार आणि पायल जाधव मुख्य भूमिकेत

'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन येत आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलीज झाला आहे. त्यामध्ये आपण दोन अनोळखी मुलींचे नशीब कसे एका रात्रीत बदलले, हे पाहिले. या दोघी आता मोठ्या झाल्या असून या नव्या प्रोमोमध्ये तुम्हाला त्यांची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. 

प्रोमोमध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर, गोरी मुलगी सावळ्या, श्रीमंत घरात दिसून येत आहे. सावळ्या मुलीचे नाव श्री तर, गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण, ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागत आहे तर, दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत. श्रीचा स्वभाव मनमोकळा, निरागस आणि प्रेमळ तर, शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे. काय आहे  श्री आणि शुभ्राच्या नशिबात? जाणून घेण्यासाठी 'अबीर गुलाल' मालिका पाहावी लागेल. 

या मालिकेत पायल जाधव आणि गायत्री दातार प्रमुख भूमिकेत आहेत. 'अबीर गुलाल' या मालिकेत अजून कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून मालिकेचा टिझर पाहून अनेकांना उत्सुकता लागली आहे. 

Web Title: 'Abeer Gulal' to hit the screens soon, starring Gayatri Datar and Payal Jadhav in lead roles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.