"खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...", आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:53 PM2024-04-27T12:53:42+5:302024-04-27T12:54:12+5:30

'आई कुठे काय करते' मालिकेत यश आणि आरोहीची लगीनघाई सुरू आहे. लग्नानंतर यश आणि आरोहीने हटके उखाणा घेतला.

aai kuthe kay karte yash and arohi special ukhana after wedding watch video | "खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...", आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

"खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...", आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. 'आई कुठे काय करते' मालिका उत्कंठावर्धक वळणावर असून सध्या मालिकेत यश आणि आरोहीच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. लवकरच यश आणि आरोही लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. त्यांची ऑनस्क्रीन जोडीही प्रेक्षकांना आवडते. 

लाडक्या लेकाच्या लग्नासाठी देशमुखांचं घर सजलं आहे. मेहेंदी सोहळा, संगीत यानंतर यश आणि आरोही सात फेरे घेणार आहेत. लग्नाआधीच आरोही मनातून देशमुखांची सून झाली आहे. देशमुखांच्या या नव्या सूनेने खास अंदाजात उखाणा घेतला आहे. "मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून, यशचं नाव घेते देशमुखांची नवीन सून", असं म्हणत आरोहीने उखाण्यातून यशचं नाव घेतलं. 

तर यशनेही आरोहीसाठी हटके उखाणा घेतला. "खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी...आरोहीचं नाव घेतो, खूप ऊन पडलंय हवंय नारळ पाणी", असं म्हणत यशने खास अंदाजात उखाणा घेतला. लग्नानंतर यश आणि आरोहीने लोकमत फिल्मीशी खास गप्पा मारल्या. 

'आई कुठे काय करते'मध्ये यश आणि आरोहीने लग्नासाठी खास पैठणी लूक केला होता. आरोहीने पैठणी साडी नेसत पेशवाई लूक केला होता. मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यात तिचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं. तर यशने पैठणी जॅकेट परिधान करत मराठमोळा लूक केला होता. 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिनेता अभिषेक देशमुख यशची भूमिका साकारत आहे. तर कौमुदी वलोकर आरोहीच्या भूमिकेत आहे. 

Web Title: aai kuthe kay karte yash and arohi special ukhana after wedding watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.