Aai Kuthe Kay Karte: आप्पांची लेक आणि अरुंधतीच्या नणंदे खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 20:41 IST2022-03-17T17:40:07+5:302022-03-17T20:41:27+5:30
आई कुठे काय करते ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायम चर्चेत असतो.

Aai Kuthe Kay Karte: आप्पांची लेक आणि अरुंधतीच्या नणंदे खऱ्या आयुष्यात आहे भलतीच ग्लॅमरस
टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. नुकतेच मालिकेत आशुतोषने देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी तिथे कांचन आई, संजना, अनिरुद्ध, अनघा, अविनाश आणि अभिषेक उपस्थित होते. या नवीन ट्वीस्टमुळे मालिकेत काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर मालिकेचा शेवट कसा होणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. यासाठी अरुंधतीचे सासरे आप्पा पुढाकर घेऊन त्या दोघांचे लग्न लावून देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आई कुठे काय करते ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायम चर्चेत असतो.मालिकेत अरुंधतीच्या नणंदेची आणि अनिरुद्धच्या बहिणीची भूमिका साकारणारी विशाखा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.
'आई कुठे काय करते' कांचन आणि आप्पांच्या मुलीची भूमिका साकारणारी पूनम चांदोरकर मालिकेत जरी ती साधी सोज्वळ दिसत असली तर खऱ्या आयुष्यात ती खूपच ग्लॅमरस आहे. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक नजर टाकली की लक्षात येतं पूनम खूपच मॉर्डन आहे. पूनम चांदोरकरने अनेक मालिका व चित्रपट यामध्ये देखील काम केल्याचे सांगण्यात येते.