चांगल्या मालिकेची माती केली...; पुन्हा ट्रोल झाली ‘आई कुठे काय करते’ मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 07:27 PM2021-09-30T19:27:46+5:302021-09-30T19:29:21+5:30

Aai Kuthe Kay Karte : नव्या प्रोमोनंतर पुन्हा एकदा ही मालिका नेटक-यांच्या निशाण्यावर आली आहे.

Aai Kuthe Kay Karte latest episode netizens angry on story troll | चांगल्या मालिकेची माती केली...; पुन्हा ट्रोल झाली ‘आई कुठे काय करते’ मालिका

चांगल्या मालिकेची माती केली...; पुन्हा ट्रोल झाली ‘आई कुठे काय करते’ मालिका

googlenewsNext
ठळक मुद्देस्त्रीवर होणार अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देतेय. मग गेली 25 वर्ष ती अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती?असा प्रश्नाचा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे.

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte Serial) ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका. पण आताश: ही मालिका पाहून प्रेक्षक वैतागल्याचे चित्र आहे. किमान सोशल मीडियावरच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहता तरी हेच वाटतंय. नव्या प्रोमोनंतर पुन्हा एकदा ही मालिका नेटक-यांच्या निशाण्यावर आली आहे.
सुरूवातीला मालिकेतील अरूंधतीचा सहनशील, कमालीचा सोशिक व सगळ्यांना सांभाळून घेणारा स्वभाव प्रेक्षकांना भावला. आता तिच्या या अतिसोशिक स्वभावाचा प्रेक्षकांना कंटाळा आला आहे. सध्या मालिकेत जे काही सुरू आहे, ते प्रेक्षकांना फार काही आवडलेलं नाही.

नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. यात अरुंधती संजनाला लढण्याचा सल्ला देताना दिसतेय. तू रडत घरी आलीस? स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघणारा पुरूष मग तो कोणीही असो, त्याला त्याची जागा दाखवलीच पाहिजे. ती हिंमत त्या बाईनेच केली पाहिजे, असे काय काय अरूंधती संजनाला सांगतेय.

या प्रोमोवर नेटक-यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेली सीरिअल बाराच्या भावात... आई विसरली का तिचा घटस्फोट झालाये, अशी कमेंट एका युजरने केली आहे. अति होतंय आता, असं म्हणत, एका युजरने या मालिकेच्या सध्याच्या कथानकाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कंटाळा आला आता या अरूंधतीला बघण्याचा. हे प्रवचन अनिरूद्धला द्यायचं ना, अशी खोचक प्रतिक्रिया अन्य एका चाहत्याने नोंदवली आहे. कुणी तरी या अरुंधतीला थांबवा, ही अरुंधती काय लेडी जेम्स बॉन्ड आहे का ?, चांगल्या मालिकेची पुन्हा माती केली, अशा अनेक प्रतिक्रिया नेटक-यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.
स्त्रीवर होणार अन्याय सहन न करण्याचे अरुंधती धडे देतेय. मग गेली 25 वर्ष ती अनिरुद्ध करत असलेला अन्याय का सहन करत होती?असा प्रश्नाचा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte latest episode netizens angry on story troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.