"माहित नाही पण डोळे पाणावले..", रुपाली भोसलेने सांगितला विमानप्रवासातील अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 11:06 AM2023-10-24T11:06:29+5:302023-10-24T11:17:12+5:30

आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन रुपाली तुफान लोकप्रियता मिळवली.

Aai kuthe kay karte fame Rupali bhosle share her experience while travel airlines | "माहित नाही पण डोळे पाणावले..", रुपाली भोसलेने सांगितला विमानप्रवासातील अनुभव

"माहित नाही पण डोळे पाणावले..", रुपाली भोसलेने सांगितला विमानप्रवासातील अनुभव

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून अनेक कलाकार नवारुपाला आले आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.  या मालिकेत संजना ही भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे रुपालीचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या पडद्यावर झळकणारी रुपाली सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर शेअर केलेली 

रुपालीने लिहीलं की, "आजपर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आणि त्यांना काहीतरी गिफ्ट देत आहेत असे फोटो पाहिले होते. पण आज जेव्हा माझ्यासोबत हे घडलेलं तेव्हा खरंच खुपच छान वाटलं, का माहित नाही पण डोळे पाणावले. थोडे इमोशनल झाले. पण चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आली." रुपालीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.  

अभिनेत्री रुपाली भोसले हिने हिंदी व मराठी मालिकेत काम केले आहे. मात्र तिला आई कुठे काय करते या मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तसेच रुपाली बिग बॉस मराठी या शोमध्येदेखील सहभागी झाली होती. त्यावेळी ती खूप चर्चेत आली होती.

Web Title: Aai kuthe kay karte fame Rupali bhosle share her experience while travel airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.