"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:07 PM2024-03-27T13:07:07+5:302024-03-27T13:07:50+5:30

"आशुतोषचं जाणं अनेकांना आवडलं नाहीये, पण...", अरुंधतीची पोस्ट चर्चेत

aai kuthe kay karte fame madhurani gokhale shared emotional post after aashutosh death | "अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

"अरुंधती आशुतोषला मिस करतेय", 'आई कुठे...'मधील ट्विस्टनंतर मधुराणी गोखले भावुक

छोट्या पडद्यावरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते'. स्टार प्रवाहवरील या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. या मालिकेतील अरुंधतीबरोबरच इतर पात्रांनाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'आई कुठे काय करते'मध्ये आशुतोषची एन्ट्री झाल्याने अरुंधतीच्या आयुष्यात पुन्हा सुख आल्यामुळे चाहतेही सुखावले होते. पण, या मालिकेत नुकतंच आशुतोषचं अपघाती निधन दाखवल्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. काही दिवसांपूर्वी अनिरुद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी याबाबत पोस्ट लिहिली होती. आता अरुंधती फेम मधुराणी गोखलेनेही तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

'आई कुठे काय करते' मालिकेतील ट्विस्टनंतर मधुराणी भावुक झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर मालिकेच्या शूटिंगदरम्यानचे आशुतोषबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. ती म्हणते, "मधले काही दिवस कोणतीही पोस्ट करायच्या मनस्थितीमध्ये नव्हते. त्यामुळे ही उशिराने डकवतेय... आशुतोषचं 'जाणं ' अनेकांना आवडलं नाहीये...कसं आवडेल...! आयुष्यात घडणाऱ्या अप्रिय घटना आवडत नाहीतच आपल्याला...पण स्वीकाराव्या लागतातच. तसंच आशुतोष जाणं आपल्याला स्वीकारावं लागेल. गेले अनेक दिवस दुखवट्याचे सीन्स करते आहे...१२/ १३ तास सलग असे काही दिवस रडते आहे... ! अभिनय अभिनय म्हंटलं तरी तुमच्यातला एक भाग तुम्ही ओतता, काही पणाला लावता तेव्हाच तो खरा वाटतो.."

"हे काही दिवस प्रचंड थकवणारे होते इतके की त्याचा काही प्रमाणात तब्येतीवरही परिणाम झालाच. डेलीसोपमध्ये भावनिक व्यवस्थापन करण्यासाठी बऱ्याचदा वेळ मिळत नाही (unwind होण्यासाठी) आणि त्याचे परिणाम दिसून येतात. अरुंधती आशुतोषला मिस करतेय तशीच आम्हाला सगळ्यांना ओंकारची तितकीच आठवण येतेय. ओंकार, आपल्या फालतू पासून गंभीर विषयावरच्या गप्पा, 90s ची गाणी मोठमोठ्याने गाणं, विषय कुठलाही असो त्यातलं तुला सखोल माहीत असणं, आणि आजूबाजूचं वातावरण हसतखेळत ठेवायचं तुझं कसब हे सगळं मिस होतंय. पुढे परत काम करूच....!! पण हा प्रवास कायम स्मरणात राहील..!", असंही पुढे तिने म्हटलं आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेता ओमकार गोवर्धन आशुतोषच्या भूमिकेत होता. या पात्रावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. त्यामुळेच मालिकेतून त्याची एक्झिट झाल्याने प्रेक्षक नाराज होते. दरम्यान, आई कुठे काय करते या मालिकेचं प्रसारण आता दुपारी २.३० वाजता होत आहे. 

Web Title: aai kuthe kay karte fame madhurani gokhale shared emotional post after aashutosh death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.