मधुराणीच्या हिरव्या साडीवर पारिजातकाचा सडा; अभिनेत्रीच्या साधेपणाने भुलले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 15:13 IST2023-07-20T15:12:25+5:302023-07-20T15:13:28+5:30
Madhurani Gokhale Prabhulkar:या फोटोतील तिचं साधेपण सुद्धा तितकंच मन मोहरून टाकणारं आहे.

मधुराणीच्या हिरव्या साडीवर पारिजातकाचा सडा; अभिनेत्रीच्या साधेपणाने भुलले चाहते
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर(Madhurani Gokhale Prabhulkar). बऱ्याच वर्षानंतर मधुराणीने आई कुठे काय करते या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. विशेष म्हणजे मोठा गॅप झालेला असतानाही तिने प्रेक्षकांची मनं सहज जिंकली. त्यामुळे आजच्या घडीला छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. मधुराणी सोशल मीडियावर सक्रीय असून तिने नुकताच एक सुरेख फोटो शेअर केला आहे.
मधुराणी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत या ना त्या कारणामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. कधी मालिकेविषयीचा किस्सा शेअर करते, कधी सेटवरच्या गंमतीजंमती, कधी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव तर कधी कविता वाचन असं सतत काही ना काही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी तिने तिचा एक अत्यंत साधा फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोतील तिचं साधेपण सुद्धा तितकंच मन मोहरून टाकणारं आहे.
मधुराणीने इन्स्टाग्रामवर तिचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने हिरव्या रंगाची गडद साडी नेसली असून त्यावर पारिजातकांच्या फुलांची नक्षीकाम केलं आहे. तसंच 'तशी माझी आनंदाची व्याख्या फारच छोटी ओंजळभर प्राजक्त आणि मनात तुझ्या आठवांची दाटी..- जान्हवी', अशा छान ओळी तिने कॅप्शनमध्ये दिल्या आहेत.
दरम्यान, मधुराणीचा हे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. दिग्गज अभिनेत्री असूनही तिचे पाय अजूनही जमिनीवर आहेत असं म्हणत अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.