लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 12:06 PM2024-03-26T12:06:59+5:302024-03-26T12:07:31+5:30

Marathi actor: 'आई कुठे काय करते' या मालिकेत त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

aai-kuthe-kay-karte-fame-advait-kadne-play-role-in-navri-mile-hitlerla-new-serial | लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

लोकप्रिय अभिनेत्याने सोडली 'आई कुठे काय करते' मालिका; आता दिसणार 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ही मालिका गेल्या ४-५ वर्षांपासून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. यामध्येच आता या लोकप्रिय मालिकेतील एका अभिनेत्याने काढता पाय घेतला आहे. विशेष म्हणजे हा अभिनेता आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेत दिसणार आहे.

नुकतीच झी मराठीवर नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  राकेश बापट याची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेत नुकतीच आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती चाहत्यांना दिली.

आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेता अद्वैत कडणे हा नवरी मिळे हिटलरला  या मालिकेत झळकणार आहे. अद्वैतने  'आई कुठे..' या मालिकेत इशाच्या पहिल्या बॉयफ्रेंडची साहिलची भूमिका साकारली होती. ही भूमिका मर्यादित काळासाठी होती. परंतु, त्यातूनही त्याने लोकप्रियता मिळवली. आता नवरी मिळे हिटलरला या मालिकेत तो महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

या नव्या मालिकेत अद्वैत लीलाच्या बहिणीच्या रेवतीच्या बॉयफ्रेंडच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. विक्रांत असं त्याच्या भूमिकेचं नाव आहे. अद्वैतने यापूर्वी अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात ‘जाऊ नको दूर बाबा !’, ‘अग्निहोत्र २’, ‘फुलपाखरु’ या मालिकांचा समावेश आहे.

Web Title: aai-kuthe-kay-karte-fame-advait-kadne-play-role-in-navri-mile-hitlerla-new-serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.