मध्यरात्री उर्फी जावेदसोबत घडला धक्कादायक प्रकार, दोन अनोळख्या व्यक्तींनी केलं गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 17:01 IST2025-12-23T17:00:56+5:302025-12-23T17:01:27+5:30
Urfi Javed : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने मध्यरात्री आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे.

मध्यरात्री उर्फी जावेदसोबत घडला धक्कादायक प्रकार, दोन अनोळख्या व्यक्तींनी केलं गैरवर्तन
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने मध्यरात्री आलेला धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मुंबईतील एका पोलीस स्टेशनचा फोटो शेअर करत, मध्यरात्री तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेचा खुलासा केला आहे.
'ई-टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने सांगितले की, २२ डिसेंबरच्या रात्री साधारण ३ वाजता एक अनोळखी व्यक्ती तिच्या घराची बेल सतत वाजवत होता. बाहेर जाऊन पाहिले असता, तिथे एक नाही तर दोन तरुण उभे होते. ते तिथून जाण्यास तयार नव्हते, अखेर घाबरलेल्या उर्फीला पोलिसांची मदत घ्यावी लागली.
उर्फीसोबत केलं गैरवर्तन
उर्फीने या घटनेचा थरार सांगताना म्हटले, "ते दोन लोक सलग १० मिनिटं माझ्या घराची बेल वाजवत होते. जेव्हा मी बाहेर डोकावून पाहिलं, तेव्हा ते मला दरवाजा उघडण्यासाठी आणि त्यांना आत घेण्यासाठी सांगू लागले. मी त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. मी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिली, तरीही ते हलले नाहीत." तिने पुढे सांगितले की, "आम्ही जेव्हा पोलिसांना फोन केला, तेव्हा त्या दोघांनी माझ्याशी आणि पोलिसांशीही अतिशय उद्धटपणे गैरवर्तन केले. ते खूप उद्धट वागत होते आणि वारंवार निघ असं ओरडत होते."
य़ा घटनेमुळे उर्फी खूप घाबरली
या अनुभवाबद्दल बोलताना उर्फी खूप घाबरली होती. ती म्हणाली, "हा अनुभव खूपच भयानक होता. जेव्हा मध्यरात्री ३ वाजता कोणीतरी तुमच्या घराबाहेर उभं राहून दरवाजा उघडायला सांगतं आणि तिथून जायला नकार देतं, तेव्हा खूप भीती वाटते. विशेषतः जेव्हा एखादी मुलगी घरी एकटी राहत असते, तेव्हा अशा घटना अधिक चिंताजनक असतात." उर्फीने त्या दोन्ही अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलीस तक्रार नोंदवली आहे. आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात, याकडे तिचे लक्ष लागून आहे.