मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:42 IST2025-01-02T09:42:08+5:302025-01-02T09:42:48+5:30

खुद्द अभिनेत्रीनेच नवीन वर्षांच्या सुरुवातीला लवकरच ती लग्न करणार असल्याची खुशखबर दिली आहे.

A famous actress Divya Pugaonkar from the Marathi cineindustry will soon tie the knot with her boyfriend. | मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' (Mulagi Jhali Ho) या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री म्हणजे दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) घराघरात लोकप्रिय झाली. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील 'लक्ष्मीनिवास' (Laxminiwas) मालिकेत काम करताना दिसते आहे. २३ डिसेंबरपासून ही मालिका भेटीला आली आहे. या मालिकेत तिने जान्हवीची भूमिका साकारली आहे. दरम्यान आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. दिव्या पुगावकर लवकरच तिचा प्रियकर अक्षय घरत(Akshay Gharat)सोबत लग्नगाठ बांधणार आहे.

दिव्या पुगावकर हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात बॉयफ्रेंड अक्षय घरत सोबतचे फोटो असून सेव्ह द डेट म्हटले आहे. तिने ही पोस्ट   शेअर करत लिहिले की, नवीन वर्ष आणि पुढे आयुष्यभर प्रेम... लवकरच अडकणार लग्नबेडीत… दिव्याच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत सेलिब्रेटीही कमेंट्स करत आहेत. सगळे तिला लग्नाची तारीख विचारत आहेत. तिने काहींच्या पोस्टवर या प्रश्नांचे उत्तर देताना म्हटले की कळेल कळेल. 


कोण आहे तिचा होणारा नवरा?
दिव्या पुगावकर प्रोफेशनल लाइफशिवाय लव्ह लाइफमुळेही चर्चेत येत असते. ती बऱ्याच कालावधीपासून अक्षय घरतसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

वर्कफ्रंट
दिव्या पुगावकर हिने 'मन धागा धागा जोडते नवा', मुलगी झाली हो, प्रेमा तुझा रंग कसा आणि विठुमाऊली या मालिकांमध्ये काम केले आहे. तिला पहिल्यांदाच मुलगी झाली हो या मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. या मालिकेतील माऊच्या भूमिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर आता ती लक्ष्मीनिवास मालिकेत काम करताना दिसते आहे.

Web Title: A famous actress Divya Pugaonkar from the Marathi cineindustry will soon tie the knot with her boyfriend.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.