'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रंगणार पल्लवी जोशीसोबत गप्पांची मैफील!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 12:10 PM2023-08-05T12:10:47+5:302023-08-05T12:11:39+5:30

Kon Honar Crorepati : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी क्विझ शो म्हणजे 'कोण होणार करोडपती'. या आठवड्यात अभिनेत्री पल्लवी जोशी हॉट सीटवर येणार आहे.

A chat concert with Pallavi Joshi will be staged on the stage of 'Kon Jauna Crorepati'! | 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रंगणार पल्लवी जोशीसोबत गप्पांची मैफील!

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रंगणार पल्लवी जोशीसोबत गप्पांची मैफील!

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी क्विझ शो म्हणजे 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati). सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांचे बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य. या आठवड्यात अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) हॉट सीटवर येणार आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळणार आहे. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात पल्लवी जोशीबरोबर गप्पा रंगणार आहेत. पल्लवीने तिच्या सुरेल स्वराने या विशेष भागाची सुरुवात केली. या विशेष भागात पल्लवी जोशीने तिच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्या पदार्पणाचा किस्सा तिने सांगितला. पहिल्या चित्रपटादरम्यान झालेली फॅन मोमेन्ट तिने आज 'कोण होणार करोडपाती'च्या मंचावर सांगितली. 

आपल्या विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात जागा असणारी अभिनेत्री पल्लवी जोशी आता 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येते आहे. यावेळी सचिन खेडेकरांबरोबर तिच्या कमाल गप्पा रंगल्या. पल्लवीच्या सुरेल आवाजात या विशेष भागाची सुरुवात झाली. पल्लवीने नासीर हुसेन यांच्याबरोबर काम करतानाच अनुभव सांगितला. त्यांनी अभिनय डोळ्यातून कसा करावा याबद्दल पल्लवीला सांगितले. एकत्र काम करत असताना त्यांनी फक्त डोळ्यातून अभिनय कसा करावा हे समजावले. पल्लवी नक्कीच त्या गोष्टी आपल्या अभिनयात वापरात आणत असेलच. आता 'श्रीमती पिरोजा माणिकजी मूस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेसाठी खेळताना ती किती रक्कम जिंकते हे पाहण्याजोगे असेल. 


नाटक, सिनेमा, मालिका असा ऑल राउंड परफॉर्मन्स करणारी अभिनेत्री पल्लवी जोशी हिचा सहभाग असलेला 'कोण होणार करोडपती'चा हा विशेष भाग ५ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल. जिंकलेली रक्कम ती 'श्रीमती पिरोजा माणिकजी मुस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट' या संस्थेला  देणार आहे. आता 'श्रीमती पिरोजा माणिकजी मुस आर्ट गॅलरी अँड कल्चरल सेंटर ट्रस्ट'साठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात ती किती रक्कत जिंकते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 
                        

Web Title: A chat concert with Pallavi Joshi will be staged on the stage of 'Kon Jauna Crorepati'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.