16 डिसेंबरला किश्वर अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात?अशा पध्दतीने होणार आहे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 16:11 IST2016-12-08T14:28:35+5:302016-12-08T16:11:56+5:30

छोट्या पडद्यावरील आणखी एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. किश्वर मर्चंट सुयश रॉय यांचा 16 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडणार ...

On 16th December, Kishvar will get married to the actress? | 16 डिसेंबरला किश्वर अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात?अशा पध्दतीने होणार आहे लग्न

16 डिसेंबरला किश्वर अडकणार या अभिनेत्यासह लग्नबंधनात?अशा पध्दतीने होणार आहे लग्न

ट्या पडद्यावरील आणखी एक जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. किश्वर मर्चंट सुयश रॉय यांचा 16 डिसेंबरला लग्नसोहळा पार पडणार आहे. किश्वर आणि सुय़श दोघेही आधीपासूनच एकमेकांना चांगले ओळखतात या दोघेही आधी त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत आले होते. त्यामुळे आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती मिळालीय.सध्या किश्वर आणि सुयश  लग्नाची  जोरदार तयारी करताय. याविषयी किश्वरला विचारले असता तिने सांगितले, आमचे लग्नाला घेवून मी खूष तर आहेच पण थोडी नर्व्हस देखील आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत त्यामुळे आता नवीन नाते आमच्या दोघांशी जोडले जाणार आहे. आम्हांला सगळ्यांचे आशिर्वाद हवे आहेत. या दोघांनाही फिरायची आवड आहे, त्यामुळे सुयशने किश्वरसाठी हनीमुनसाठी  खास सरप्राईज प्लॅनिंग केले आहे. नेहमी कलाकारांचे हे लग्न मोठे थाटात होताना आपण पाहिलेत. मात्र किश्वर आणि सुयश त्यांच्या  लग्नाचा गाजावाजा न करता  अगदी साध्या पध्दतीत कोर्टमॅरेज करणार आहेत. लग्न साध्या पध्दतीने होणार असले तरी यांच्या लग्नाचे काही खास वैशिष्ट्य आहेत ते मेहंदीचा कार्यक्रम हा किश्वरच्या मुस्लिम परंपरेने तर संगीत कार्यक्रम हे सुयशच्या पंजाबी परंपरेनुसार होणार आहे.त्यानंतर 16 डिसेंबरला कोर्टात हे लग्न करतील. आपल्या खास मित्रपरीवारासाठी रिसेप्शन पार्टीही देणार आहेत.किश्वर आणि सुयश या दोघांनाही त्यांच्या भावी आयुष्याकरिता आमच्याकडूनही खूप सा-या शुभेच्छा !


 
 

Web Title: On 16th December, Kishvar will get married to the actress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.