१२३४ चा फस्ट लूक व ट्रेलर आउट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 02:13 IST2016-03-16T09:13:23+5:302016-03-16T02:13:23+5:30
फायनली, १२३४ या चित्रपटाला मुहर्त मिळाला.

१२३४ चा फस्ट लूक व ट्रेलर आउट
म लींद कवडे दिग्दर्शित '१२३४' या चित्रपटाची चर्चा खूप दिवसांपासून होती. व हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता सर्वाना होती. फायनली, १२३४ या चित्रपटाला मुहर्त मिळाला. नुकतेच या चित्रपटाचा फस्ट लूक व ट्रेलक आउट करण्यात आला आहे. हा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट असून या चित्रपटात संजय नार्वेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे, विजय मौर्या, जयवंत वाडकर, अनिकेत केळकर, विशाखा सुभेदार, तेजा देवकर,संजय मोने, अभिजीत चव्हाण, अरूण कदम, विजय कदम, यतिन कार्येकर,मृणालिनी जांभळे, अंशुमन विचारे, किशोर चौघुले प्रणव रावराणे या कलाकारांचा समावेश आहे. १२३४ हा चित्रपट २७ मे रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.