तेजस्विनीने अनुभवली ढोलताशाची झिंग

By Admin | Updated: September 21, 2015 02:57 IST2015-09-21T02:57:10+5:302015-09-21T02:57:10+5:30

गणेशोत्सव म्हणजे सगळीकडेच उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आणि त्याला ढोलाच्या ठोक्याची आणि ताशाच्या तर्रीची साथ हे जणू समीकरणच.

Tejaswini has experienced dholataish zing | तेजस्विनीने अनुभवली ढोलताशाची झिंग

तेजस्विनीने अनुभवली ढोलताशाची झिंग

गणेशोत्सव म्हणजे सगळीकडेच उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण आणि त्याला ढोलाच्या ठोक्याची आणि ताशाच्या तर्रीची साथ हे जणू समीकरणच. बाप्पा म्हटल्यावर ढोलताशाची धूम ही आलीच पाहिजे. जगभराला या पुणेरी ढोलताशाचं आकर्षण. वेगवेगळ्या देशांतून परदेशी नागरिक हा उत्सव एन्जॉय करायला आणि ढोलताशाची झिंग अनुभवायला आवर्जून उपस्थित राहतात. काही जण तर स्वत: ढोलताशा वाजवून त्याचा आनंद लुटतात. मग या आनंदात सहभागी होण्यात आपली कलाकार मंडळी मागे राहूच शकत नाहीत. आता हेच पाहा ‘तू हि रे’ या नुकत्याच प्रचंड पसंती मिळवलेल्या चित्रपटात ग्लॅमरस लूकमधील तेजस्विनी पंडित उत्साहात ढोल वाजवण्यात रमून गेली. एरवी रुपेरी पडद्यावर कधी साडी तर कधी पंजाबी, जीन्स अशा वेगवेगळ्या डे्रसमध्ये दिसणारी नायिका ढोलताशासाठी मात्र सफेद झब्बा, त्यावर लाल किंवा केशरी ओढणी, कानात झुमके, टिकली, नथ अशा पारंपरिक शृंगाराचा बॅलन्स करीत ढोलताशाच्या गजरात सहभागी झाली आहे.

Web Title: Tejaswini has experienced dholataish zing