'ढिशूम'ची टीम सैराटच्या 'झिंगाट'वर थिरकली

By Admin | Updated: June 24, 2016 20:39 IST2016-06-24T20:33:13+5:302016-06-24T20:39:50+5:30

लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ढिशूमची टीम सैराट या मराठी चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर थिरकली.

The team of 'Dhashoom' threw on Serrat's 'Zingat' | 'ढिशूम'ची टीम सैराटच्या 'झिंगाट'वर थिरकली

'ढिशूम'ची टीम सैराटच्या 'झिंगाट'वर थिरकली

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २४ - लोकमततर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ढिशूमची टीम सैराट या मराठी चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर थिरकली.

येथील काँग्रेसनगरातील धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानात लोकमततर्फे आयोजित कार्यक्रमात ढिशूम या आगामी चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी दाखल झाली होती. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन व जॅकलिन फर्नांडिस यांच्या सहभाग होता. यावेळी त्यांनी सैराट या मराठी चित्रपटातील झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर ताल धरत डान्स केला. तसेच, यावेळी त्यांच्या चाहत्यांनी अलोट गर्दी करत त्यांना साथ दिली.

अ‍ॅक्शन-थ्रिलरवर आधारित असलेल्या ढिशूम चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित धवनने  केलं आहे. रोहित धवन हा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा असून वरुण त्याचा भाऊ आहे.

ढिशूम या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम, वरुण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी भूमिका साकारल्या असून हा चित्रपट २९ जुलै २०१६ रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे.
 
 

Web Title: The team of 'Dhashoom' threw on Serrat's 'Zingat'