स्वप्निल-सुबोध पहिल्यांदा एकत्र

By Admin | Updated: March 17, 2016 02:02 IST2016-03-17T02:02:36+5:302016-03-17T02:02:36+5:30

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान आणि शाहरूख या स्टार जोडीला एकत्रित पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्साही असतात. त्याचप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील दोन स्टार मराठी कलाकारांना एकत्र पाहण्याची

Swapnil-Subodh together for the first time | स्वप्निल-सुबोध पहिल्यांदा एकत्र

स्वप्निल-सुबोध पहिल्यांदा एकत्र

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान आणि शाहरूख या स्टार जोडीला एकत्रित पाहण्यासाठी सर्वच प्रेक्षक उत्साही असतात. त्याचप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्येदेखील दोन स्टार मराठी कलाकारांना एकत्र पाहण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत. याच रसिक मायबापांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा स्वप्निल जोशी व सुबोध भावे अशी हटके जोडी २०१६मध्ये सरप्राइज पॅकेज घेऊन येत असल्याचे अभिनेता सुबोध भावे याने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले. सुबोध म्हणाला, स्वप्निल आणि मी फुगे या मराठी चित्रपटातून पहिल्यांदा एकत्रित येत आहोत. त्यामुळे प्रेक्षकांसहित आमची खूप दिवसांची इच्छाही पूर्ण होत आहे. खास एकत्रित येण्यासाठी या चित्रपटाची कथादेखील आम्ही दोघांनी पहिल्यांदा स्वत: लिहिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना जोशी करणार असून, निर्र्माते गिरीश मोहिते आहेत. चला तर या
मराठी इंडस्ट्रीच्या नवीन
व या हटके जोडीला या चित्रपटासाठी शुभेच्छा
देऊ या.

Web Title: Swapnil-Subodh together for the first time