सुशनंतर ऊर्मिलाचे एरिअल सिल्क

By Admin | Updated: May 27, 2016 02:11 IST2016-05-27T02:11:45+5:302016-05-27T02:11:45+5:30

बॉलीवूडची ब्युटी क्वीन सुश्मिता सेनच्या एरिअल सिल्क डान्स फॉर्मचे दिवाने तर अनेक आहेत. सुशने या डान्स फॉर्मचे प्रशिक्षण घेतले असून तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हा डान्स

Suspensional Urmila's Ariel Silk | सुशनंतर ऊर्मिलाचे एरिअल सिल्क

सुशनंतर ऊर्मिलाचे एरिअल सिल्क

बॉलीवूडची ब्युटी क्वीन सुश्मिता सेनच्या एरिअल सिल्क डान्स फॉर्मचे दिवाने तर अनेक आहेत. सुशने या डान्स फॉर्मचे प्रशिक्षण घेतले असून तिने अनेक कार्यक्रमांमध्ये हा डान्स करून वाहवा मिळविली आहे. हाच डान्स फॉर्म आता आपल्या मराठमोळ्या ऊर्मिला कोठारेनेदेखील शिकला आहे. एरिअल सिल्क शिकणारी ऊर्मिला ही मराठी फिल्म इंडस्ट्रीतील पहिलीच अभिनेत्री आहे. याबद्दल ऊर्मिलाने ‘सीएनएक्स’सोबत तिच्या या एरिअल सिल्क डान्सविषयी भरभरून गप्पा मारल्या; अन् अनेक गोष्टींचा उलगडा केला. ऊर्मिला म्हणाली, फुलवाची मुलगी आदिती देशपांडे यांच्याकडे एरिअल सिल्क शिकत होती. मी जेव्हा तिला डान्स करताना पाहिले तेव्हा पटकन बोलून गेले आमच्या आई-वडिलांनी आम्हाला लहानपणी असा काही डान्स फॉर्म शिकवला असता तर मी ही असा परफॉर्म करू शकले असते. तेव्हा आदितीने मला बूस्ट केले अन् म्हणाली, तू आजही शिकू शकतेस. मग मी गेल्या एक वर्षापासून एरिअल सिल्क शिकत आहे. आदिती सुश्मिता सेनचीदेखील ट्रेनर आहे. मी पहिल्यांदा करताना थोडी घाबरायचे. आदितीने करून दाखविलेल्या स्टेप्स मला अवघड वाटायच्या; मग मी म्हणायचे, मला जरा सोप्या स्टेप्स करून दाखव. पण ती माझ्याकडून सर्वच स्टेप करून घ्यायची. तुम्हाला हा डान्स फॉर्म करताना आर्म, शोल्डर अ‍ॅण्ड अप्पर बॉडी स्ट्रेन्थ प्रचंड लागते. फोटोशुट करतानादेखील खूप मजा आली. कारण त्या प्रॉपर पोझला जाऊन मला काही सेकंद होल्ड करावे लागायचे मग तेजस क्लिक करायचा. मी त्याला सांगून ठेवले होते तू एकदम रेडी राहा. अगदी डोळ्यांवर कॅमेरा ठेवूनच बस. मी पोझ घेतल्या घेतल्या दोन तीन शॉर्ट खडखड मार म्हणजे तुला ते प्रॉपर फोटोज मिळतील. ऊर्मिलाचा हा डान्स फॉर्म मोठ्या पडद्यावर कोणत्या चित्रपटात पाहायला मिळतोय याची प्रतीक्षा तिचे चाहते नक्कीच करत असतील यात काही शंका नाही.

Web Title: Suspensional Urmila's Ariel Silk