‘किसिंग सीन’ देताना सुशांतची गोची

By Admin | Updated: November 3, 2014 01:44 IST2014-11-03T01:44:57+5:302014-11-03T01:44:57+5:30

‘खोसला का घोसला’ , ‘ओय लकी लकी ओय’सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारा दिवाकर बॅनर्जी सध्या सुशांतसिंह राजपूतसोबत नव्या चित्रपटाची निर्मिती करीत आहे.

Sushant's hand in giving 'kissing scene' | ‘किसिंग सीन’ देताना सुशांतची गोची

‘किसिंग सीन’ देताना सुशांतची गोची

‘खोसला का घोसला’ , ‘ओय लकी लकी ओय’सारख्या चित्रपटांची निर्मिती करणारा दिवाकर बॅनर्जी सध्या सुशांतसिंह राजपूतसोबत नव्या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. यशराज बॅनरअंतर्गत तयार केल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या शूटिंगवेळी ‘किसिंग सीन’ देताना सुशांतसिंहची चांगलीच गोची झाल्याचे दिवाकरचे म्हणणे आहे. एका दृश्यात सुशांतला अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी हिच्याशी ‘लिपलॉक’ करायचे होते; परंतु आठ प्रयत्नानंतरही सुशांतला हे दृश्य देता आले नाही. सामान्य चुंबन दृश्यापेक्षा हा सीन वेगळा होता. ‘धोका, षड्यंत्र खून’ यांचा चित्रपटात समावेश असल्याने या दृश्याच्यावेळी सुशांतचा चेहरा त्रासिक दाखवायचा होता; परंतु आठ प्रयत्नानंतरही दृश्य चित्रित न झाल्याने मी चिंतित झालो, असे दिवाकरचे म्हणणे आहे. ‘व्योमकेश बक्षी’ या शरदचंद्र बंडोपाध्याय यांच्या काल्पनिक पात्रावर आधारलेला आहे.

Web Title: Sushant's hand in giving 'kissing scene'