संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:32 IST2025-06-16T13:31:50+5:302025-06-16T13:32:45+5:30

संजय कपूर यांच्या पोलो टीमने त्यांना श्रद्धांजली वाहिली असून शेवटची आठवणही शेअर केली आहे.

sunjay kapur last photo seen smiling with polo team captain during semifinal match | संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव

संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव

अभिनेत्री करिष्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur)  यांचं लंडनमध्ये निधन झालं. पोलो खेळताना मधमाशी तोंडात गेली आणि त्यांना हृदयविकाराचा धक्का झाला. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आता संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर आला आहे. यामध्ये ते मित्रासोबत हसतच पोज देताना दिसत आहेत.

संजय कपूर यांना पोलो खेळाची आवड होती. Sujan Indian Tigers या त्यांच्या पोलो टीमकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. टीमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन संज. कपूर यांचा शेवटचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी टीमची जर्सी घातली आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रही आहे. ते हसतच कॅमेऱ्याकडे पाहून पोज देत आहेत. फोटोसोबत टीमने लिहिले,"आज आम्ही आमचा चांगला मित्र संजय कपूरच्या आठवणीत cartier Trophy ची फायनल मॅच खेळत आहोत. काही दिवसांपूर्वीच त्याचं फील्डवरच निधन झालं. आमचे कॅप्टन जैसल सिंह टीमसोबत संजयच्या सम्मानासाठी एक मिनिट मौन पाळत श्रद्धांजली वाहतील."

त्यांनी पुढे लिहिले, "संजय आणि जैसल यांचा हा फोटो काही दिवसांपूर्वी सेमीफायनल मॅचच्या आधीचा आहे. संजय तुझी आठवण येत राहील. तुझा अथक उत्साह आणि पाठिंबा आपल्या पोलो टीमच्या कायम स्मरणात राहील."


संजय कपूर यांनी मृत्यूच्या तीन दिवसांपूर्वीच एक पोस्ट केली होती. ज्यात त्यांनी 'पृथ्वीवर सर्वांची वेळ निश्चित आहे' असं म्हटलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या निधनाच्या काही तास आधी अहमदाबाद विमान दुर्घटना घडली होती. संजय कपूर यांनी ट्वीट करत विमान अपघातात जीव गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती.

Web Title: sunjay kapur last photo seen smiling with polo team captain during semifinal match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.