गोविंदाचा घटस्फोट होतोय? पत्नीनं सोशल मीडियावरून हटवलं आडनाव, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 14:11 IST2025-06-18T13:54:58+5:302025-06-18T14:11:48+5:30
गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.

गोविंदाचा घटस्फोट होतोय? पत्नीनं सोशल मीडियावरून हटवलं आडनाव, म्हणाली...
बॉलिवूड अभिनेता गोविंदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. गोविंदाचं ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचंही बोललं जात होतं. त्यानंतर गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अलिकडेच सुनीता आहुजाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाइलवरून 'आहुजा' हे आडनाव हटवलं. यानंतर सुरु झालेल्या दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर सुनीता आहुजांनी स्वत:च स्पष्टीकरण दिलं आहे.
सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 'आहुजा' हे आडनाव काढून टाकलं. तिने तिच्या सुनीता या नावापुढे इंग्रजीतील 'एस' हे अक्षर जोडलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सुनीताने यामागचं नेमकं कारण सांगितलं आहे. टाईम्स ऑफ इंडियानुसार सुनीताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून आडनाव काढण्यामागचं कारण अंकशास्त्र असल्याचं म्हटलं आहे. अंकशास्त्रानुसार सुनीताने तिच्या नावात बदल केला आहे आणि हा बदल गेल्या एक वर्षापूर्वी केला असल्याचेही तिने सांगितलं. तसंच सुनीताने असाही दावा केला की, हा बदल केल्यानंतर तिला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.
सुनीता आहुजांनी स्पष्ट केलं की, गोविंदा आणि त्यांच्यात सर्व काही ठिक आहे. ठमी हे जग सोडून जाईन तेव्हाच 'आहुजा' हे आडनाव कायमचं काढलं जाईल. मी अजूनही गोविंदाची पत्नी आहे आणि आम्ही एक आनंदी कुटुंब आहोत", असं त्यांनी ठामपणे सांगितलं. गोविंदा आणि सुनीता यांचं १९८६ मध्ये लग्न झालं होतं. त्यांच्या दोन मुलांपैकी एक मुलगा यशवर्धन असून मुलगी टीना आहुजा ही देखील अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.