सुमन एंटरटेनमेंटने चेतन गरुड प्रोडक्शनचे युट्यूब चॅनल्स घेतले ताब्यात, मनोरंजन उद्योगात गाठला महत्त्वाचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:34 AM2024-04-26T11:34:15+5:302024-04-26T11:36:17+5:30

जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा दर्जेदार कंटेंट तयार करण्यात चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपीशी संलग्न युट्यूब चॅनेल्सची ख्याती आहे.

Suman Entertainment and Media acquires YouTube channels of Chetan Garud Productions to mark major milestone in entertainment industry | सुमन एंटरटेनमेंटने चेतन गरुड प्रोडक्शनचे युट्यूब चॅनल्स घेतले ताब्यात, मनोरंजन उद्योगात गाठला महत्त्वाचा टप्पा

सुमन एंटरटेनमेंटने चेतन गरुड प्रोडक्शनचे युट्यूब चॅनल्स घेतले ताब्यात, मनोरंजन उद्योगात गाठला महत्त्वाचा टप्पा

सुमन एंटरटेनमेंट अँड मीडिया या मनोरंजन उद्योगातील एका आघाडीच्या संस्थेने नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार कंटेंटसाठी प्रसिद्ध असलेल्या चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओच्या युट्यूब चॅनेल्सचा ताबा मिळवला. हे धोरणात्मक पाऊल दोन्ही पक्षांसाठी सतत विकसित होत असलेल्या मनोरंजन विश्वात मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे या दोन्ही संस्थांचे स्थान या क्षेत्रात मजबूत होईल. जगभरातील प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा दर्जेदार कंटेंट तयार करण्यात चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपीशी संलग्न युट्यूब चॅनेल्सची ख्याती आहे. ही संस्था आता सुमन एंटरटेनमेंट आणि मीडियाच्या अंतर्गत काम करेल. यामुळे या युट्यूब चॅनेल्सचा प्रसार अधिक चांगल्या प्रकारे होईल.

सार्वजनिक सूचना

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की सुमन एन्टरटेन्मेंट अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेडने खालील युट्यूब चॅनेल्स विकत घेतले आहेत:

•⁠ चॅनेलचे नाव: Chetan Garud Productions Studios LLP

•⁠ एकूण सब्स्क्रायबर्स: 165,000+

•⁠ चॅनेलचे नाव: CGP Music India

•⁠ एकूण सब्स्क्रायबर्स: 30,882

दोन्ही चॅनेल्स एकत्रित केल्याने, एकूण 2 लाख पेक्षा जास्त सब्स्क्रायबर्स आहेत. हे संपादन सुमन एंटरटेनमेंट अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे केले जात आहे. या व्यवहाराबाबत कोणत्याही व्यक्तीला आक्षेप किंवा समस्या असल्यास, कृपया खाली दिलेल्या ईमेलद्वारे आमच्याशी संपर्क साधा. विक्रेता कंपनीचे (गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपी) प्रतिनिधीत्व करणारे चेतन गरुड आणि वीणा गरुड यांनी या व्यवहारास संमती दिली आहे आणि त्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे.

या व्यवहाराबाबत भाष्य करताना, चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपीचे संस्थापक चेतन गरुड यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, "सुमन एंटरटेनमेंट आणि मीडियाला आमचे युट्यूब चॅनेल्स विकण्याच्या या धोरणात्मक  निर्णयामुळे व्यवसायात वाढ करण्याचे मार्ग खुले झाले आहेत. आम्हाला खात्री आहे की या वैविध्यपूर्ण संधी असलेल्या मनोरंजन विश्वात सुमन एंटरटेनमेंट अँड मीडियाच्या मार्गदर्शनाखाली यशाची नवीन उंची गाठणे लवकरच शक्य होईल."

प्रत्युत्तरादाखल, सुमन एंटरटेनमेंट आणि मीडिया एलएलपीचे सीईओ केदार जोशी यांनी सांगितले, "चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपीशी संलग्न युट्युब चॅनेल्सचे सुमनच्या परिवारात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. हे संपादन आमच्या प्रतिभेला चालना देण्याच्या आणि दर्जेदार कंटेंटसह जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोचण्याच्या आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. जगभरातील प्रेक्षकांसाठी आम्ही एकत्रितपणे मनोरंजनाच्या सीमा विस्तारित करण्यास तसेच उत्कृष्टतेचे नवीन मानदंड स्थापित करण्यास उत्सुक आहोत."

या संपादनाच्या माध्यमातून, सुमन एंटरटेनमेंट आणि मीडिया मनोरंजन उद्योगातील नाविन्य, सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेसाठी कटिबद्ध आहे. दोन्ही संस्था विविध प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना आकर्षित करणारा दर्जेदार कंटेंट तयार करण्यासाठी त्यांच्या एकत्रित क्षमतेचा लाभ घेण्यास तयार आहेत.

सुमन एंटरटेनमेंट आणि मीडिया बद्दल:

सुमन एंटरटेनमेंट आणि मीडिया ही एक अग्रगण्य मनोरंजन कंपनी आहे जी अनेक माध्यमांद्वारे उच्च दर्जाचा कंटेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. ही संस्था चित्रपट, टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया अशा विविध माध्यमांतून निखळ मनोरंजनाचा लाभ देण्याचे काम अविरत करत आहे.

चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपी बद्दल:

चेतन गरुड प्रॉडक्शन स्टुडिओ एलएलपी नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कंटेंट निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. कंपनीशी संलग्न असलेल्या युट्यूब चॅनेल्सनी जगभरातील प्रेक्षकांना समीक्षकांची प्रशंसा आणि व्यावसायिक यश मिळवत सातत्याने निखळ मनोरंजनाची सेवा पुरविली आहे

Web Title: Suman Entertainment and Media acquires YouTube channels of Chetan Garud Productions to mark major milestone in entertainment industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.