सुबोधचे बालनाट्य सुपरहिट

By Admin | Updated: May 26, 2016 02:40 IST2016-05-26T02:40:01+5:302016-05-26T02:40:01+5:30

‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता अभिनेता सुबोध भावे बालनाट्य करीत आहे. सध्या रंगमंचावर येणाऱ्या व्यावसायिक अन् प्रायोगिक नाटकांकडे

Subodh's Badlattya Super Hit | सुबोधचे बालनाट्य सुपरहिट

सुबोधचे बालनाट्य सुपरहिट

‘कट्यार काळजात घुसली’सारख्या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता अभिनेता सुबोध भावे बालनाट्य करीत आहे. सध्या रंगमंचावर येणाऱ्या व्यावसायिक अन् प्रायोगिक नाटकांकडे पाहता बालनाट्ये लोप पावली आहेत की काय, असा प्रश्न पडला होता. तर बालनाट्यप्रेमींना आता आपल्याला रंगभूमीवर बालनाट्य पुन्हा पाहता येईल की नाही, अशी चिंता वाटत होती. परंतु, थेट सुबोध भावे यांनी चिमुकल्यांसोबत रंगमंचावर येऊन बालनाट्ये सादर केली आहेत. सुबोधच्या या बालनाट्यांना प्रेक्षकांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. सुबोधने याबद्दल नुकतेच सोशल साइट्सवर सांगितले आहे. तो म्हणतोय की, पुण्यातील बालनाट्याचा शो पुन्हा एकदा हाऊसफुल्ल झाला. क्या बात है? सुबोधचे बालनाट्याचे प्रयोगदेखील आज हाऊसफुल्ल होत आहेत अन् लहान मुलांपासून पालकांपर्यंत सर्वांनाच ते आवडतायत ही खरंच चांगली गोष्ट आहे.

Web Title: Subodh's Badlattya Super Hit