बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:58 IST2025-09-30T10:53:56+5:302025-09-30T10:58:05+5:30
शूरा खानच्या बेबी शॉवरची खास झलक

बेबी खान लवकरच येणार, शूराचं पार पडलं डोहाळजेवण; सलमानसह टीव्ही कलाकारांची हजेरी
अरबाज खानची पत्नी शूरा खान गरोदर आहे. नुकतंच तिचं डोहाळजेवण पार पडलं. इंडस्ट्रीतील काही कलाकारांनी तिच्या बेबी शॉवरला हजेरी लावली. या फंक्शनमधील काही फोटो आता समोर आले आहेत. टीव्ही अभिनेत्री निया शर्मा शूराच्या डोहाळजेवणाला गेली होती. तिने काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत. ग्रँड वेन्यू, आकर्षक डेकोरेशन, केक आणि बलून्सने सर्व सजवण्यात आल्याचं दिसत आहे.
शूरा खानच्या बेबी शॉवरची झलक समोर आली आहे. रंगीबेरंगी फुगे, टेडी बिअर, 'बेबी खान' अशी नेमप्लेट असं सुंदर डेकोरेशन केलेलं दिसत आहे. मधोमध एक छान केक, त्यावरही आकर्षक सजावट, लाईट्स अशा वातावरणात शुराचं डोहाळजेवण साजरं झालं. पिवळ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये शूरा कमालीची सुंदर दिसत आहे. तर अरबाज खाननेही पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान करत ट्विनींग केलं आहे. दोघांची जोडी खूप गोड दिसत आहे. तसंच दोघंही येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागतासाठी सज्ज आहेत.
शूरा खानच्या बेबी शॉवरला जन्नत जुबैर, रिद्धिमा पंडित हे टीव्ही स्टार्सही दिसले. शिवाय संपूर्ण खान कुटुंबही हजर होतं. सलमान खान हाय सिक्युरिटीसह पोहोचला होता. तसंच त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरनेही बेबी शॉवर अटेंड केलं.
अरबाज खानने जूनमध्येच ही गुडन्यूज सर्वांसोबत शेअर केली होती. अरबाजला पहिली पत्नी मलायकापासून २३ वर्षांचा अरहान हा मुलगा आहे. २०२३ मध्ये त्याने शूरासोबत लग्न केलं. तर आता अरबाज खान वयाच्या ५८ व्या वर्षी पुन्हा बाबा होणार आहे.