श्रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटात श्रीदेवी नव्हे तर झळकणार होती ही अभिनेत्री, या अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाले श्रीदेवी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 13:50 IST2018-02-26T08:20:27+5:302018-02-26T13:50:27+5:30
श्रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटाची आजही चर्चा होते. या चित्रपटात श्रीदेवी यांची जोडी अनिल कपूरसोबत जमली होती. अतिशय गर्विष्ट ...
.jpg)
श्रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटात श्रीदेवी नव्हे तर झळकणार होती ही अभिनेत्री, या अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी झाले श्रीदेवी यांचे निधन
श रीदेवी यांच्या लाडला या चित्रपटाची आजही चर्चा होते. या चित्रपटात श्रीदेवी यांची जोडी अनिल कपूरसोबत जमली होती. अतिशय गर्विष्ट अशा मुलीची व्यक्तिरेखा श्रीदेवी यांनी या चित्रपटात साकारली होती. या चित्रपटातील श्रीदेवी यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, लाडला या चित्रपटासाठी श्रीदेवी निर्माते आणि दिग्दर्शकांची पहिली चॉईस नव्हती. लाडला या चित्रपटात दिव्या भारती मुख्य भूमिका साकारणार होती. दिव्याने या चित्रपटासाठी चित्रीकरण देखील करायला सुरुवात केली होती. या चित्रपटात श्रीदेवी अनिल कपूरशी कंपनीच्या बाहेर भांडते आणि त्यानंतर तिच्या गाडीला आग लागते हा प्रसंग दिव्यावर चित्रीत देखील करण्यात आला होता. पण अचानक दिव्याचे निधन झाल्यामुळे हा चित्रपट अर्धवट राहिला. दिव्या अंधेरी येथे तिचे पती साजिद नाडियाडवाला यांच्यासोबत राहात होती. रात्रीच्या वेळात बाल्कनीमधून खाली पडल्यामुळे दिव्याचा मृत्यू झाला होता.
दिव्याच्या मृत्यूनंतर लाडला या चित्रपटाचे काय करायचे हा प्रश्न चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांना पडला होता. लाडला या चित्रपटासाठी दिव्यानंतर श्रीदेवीचा विचार करण्यात आला आणि तिने देखील या चित्रपटात काम करण्यास लगेचच होकार दिला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.
![divya bharti in ladla movie]()
श्रीदेवी यांचे २४ फेब्रुवारीला निधन झाले तर दिव्या भारतीचा वाढदिवस २५ फेब्रुवारीला होती. दिव्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यापासून तिची तुलना श्रीदेवी यांच्याशी केली जात होती. ती श्रीदेवी यांच्यासारखीच दिसते असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे दिव्या श्रीदेवी यांची लहान बहीण आहे का असा अनेकांना प्रश्न पडला होता.
अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Also Read : ही होती श्रीदेवी यांची अंतिम इच्छा