'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:29 IST2025-07-12T10:28:38+5:302025-07-12T10:29:04+5:30
गी ह्युनने या भूमिकेतून त्याने सर्वांचं मन जिंकलं.

'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
ओटीटीवर 'स्क्विड गेम' (Squid Games) सीरिज कमालीची गाजली. या सीरिजने प्रेक्षकांना वेड लावलं. लहान मुलंही स्क्विड गेमचे चाहते झाले. याच्या अनोख्या संकल्पनेमुळे ही इतर सीरिजपेक्षा वेगळी ठरली. नुकताच सिनेमाचा तिसरा सीझन आला. हा देखील खूप गाजला. सीरिजमधील मुख्य अभिनेता ली जुंग ग्लोबल स्टार झाला आहे. त्याने गी ह्युन ही भूमिका साकारली. माणुसकीचा संदेश त्याने आपल्या भूमिकेतून दिला. अभिनेता ली जुंग भारतीय सिनेमातही दिसेल का? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
'स्क्विड गेम' निमित्ताने सीरिजमधील सर्व कलाकारांनी अनेक मुलाखती दिल्या. सीरिजविषयी तो म्हणाला, " ही सीरिज माझ्यासाठी खूप खास आहे. सीझन ३ च्या शूटवेळी जेव्हा मी पहिल्यांदा ४५६ नंबरचा हिरव्या रंगाचा ट्रॅकसूट घातला आणि पहिल्यांदा सेटवर पाऊल ठेवलं तेव्हा माझ्या मनात अनेक संमिश्र भावना होत्या. लाल रंगाचा विग घातल्यानंतरही मला तीच भावना आली. मी या इंडस्ट्रीत बऱ्याच काळापासून आहे. पण याआधी कधीच माझ्या मनात इतक्या भावना दाटून आल्या नाहीत."
भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याविषयी तो म्हणाला, "संधी मिळाली तर नक्कीच मला भारतीय सिनेमांमध्ये काम करायला आवडेल. माझ्यासाठी ती सुद्धा खूपच खास गोष्ट असेल."
स्क्विड गेम सीरिज जगभरात लोकप्रिय झाली. तिसरा सीझन सीरिजचा शेवट होता. या मध्ये गी ह्युनचा मृत्यू होतो. शेवटी फ्रंट मॅनची झलक दिसते ज्यामध्ये तो रस्त्यावरील दोन माणसांकडे पाहत असतो. ते कार्डचा गेम खेळत असतात. यावरुन सीरिजचा पुढचा सीझन येणार अशीच हिंट यातून दिली आहे.