'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:48 IST2025-05-27T16:47:38+5:302025-05-27T16:48:08+5:30
'सितारे ज़मीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे. आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन. जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे.

'मिस्टर बीन'सारखा कलाकार होण्याचं स्वप्न! आमिर खानसोबत 'सितारे जमीन पर'मध्ये झळकणाऱ्या 'रजु'विषयी जाणून घ्या
आमिर खानच्या 'सितारे ज़मीन पर' या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. 'सितारे ज़मीन पर'मधून एक आगळावेगळा विषय घेऊन आमिर खान प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आमिर खान प्रॉडक्शन्सनेच याची निर्मितीही केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांमध्ये त्याबाबत उत्सुकता आहे. सादर करत आहे वर्षातील सर्वात हृदयस्पर्शी कुटुंबप्रधान चित्रपट 'सितारे ज़मीन पर', जो २० जून २०२५ रोजी केवळ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
२००७ साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट तारे ज़मीन पर या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. या चित्रपटात आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर 'सितारे ज़मीन पर' चित्रपटाच्या माध्यमातून १० उदयोन्मुख कलाकारांची ओळख प्रेक्षकांना करून दिली जात आहे. आता या कलाकारांमध्ये एक महत्त्वाचं नाव म्हणजे ऋषभ जैन. जो चित्रपटात ‘रजु’ ही भूमिका साकारत आहे. ऋषभने बालपणापासून मिस्टर बीनसारखा कलाकार होण्याचं स्वप्न पाहिलं आहे.
निर्माता-मंडळींनी नुकतंच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर करत रजुची ओळख करून दिली. या व्हिडिओमध्ये ऋषभ म्हणतो, “रजु म्हणजे अर्थातच या चित्रपटाचा हिरो आहे, कारण तो आमिर सरांसोबत स्क्रीन शेअर करतो.” ऋषभची आईसुद्धा गंमतीशीरपणे सांगते, “जेव्हा त्याची दाढी असते तेव्हा तो ‘रजु’ असतो आणि जेव्हा नसते तेव्हा पुन्हा ऋषभ होतो!” स्वतः ऋषभने त्याच्या सहकलाकारांविषयी बोलताना सांगितलं, “टीम सितारे म्हणजेच सर्वोत्कृष्ट टीम!” येत्या २० जूनला 'सितारे ज़मीन पर' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.