प्रभासचा ‘Adipurush’ पुन्हा अडचणीत, आता पोस्टर कॉपी केल्याचा मोठ्या स्टुडिओचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 10:08 AM2022-10-06T10:08:08+5:302022-10-06T10:08:48+5:30

चाहत्यांचा उत्साह पाहून प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक पोस्टर २ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला.

south superstar Prabhas starrer Adipurush poster a copy claims animation studio teaser release netizens troll | प्रभासचा ‘Adipurush’ पुन्हा अडचणीत, आता पोस्टर कॉपी केल्याचा मोठ्या स्टुडिओचा दावा

प्रभासचा ‘Adipurush’ पुन्हा अडचणीत, आता पोस्टर कॉपी केल्याचा मोठ्या स्टुडिओचा दावा

googlenewsNext

चाहत्यांचा उत्साह पाहून प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटाचा टीझर आणि फर्स्ट लूक पोस्टर २ ऑक्टोबरला रिलीज करण्यात आला. मात्र, हा टीझर लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ‘आदिपुरुष’ चित्रपटातील दृश्यांमध्ये काहीही परिणामकारक नसल्याचे नेटिझन्सना वाटले. हा टीझर 'गेम ऑफ थ्रोन्स'वरून कॉपी करण्यात आल्याचेही काहींनी सांगितले. परंतु आता, एका अॅनिमेशन स्टुडिओने हा पोस्टर त्यांच्या कामाची कॉपी असल्याचा दावा केला आहे. आदिपुरुष या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे.

आदिपुरूषच्या टीझरला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं होतं. तसंच याशिवाय रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानही योग्य वाटत नसल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. आता एका ॲनिमेशन स्टुडिओनं टीझरचा फर्स्ट लूक पोस्टर आणि काही सीन्स आपल्या कामावरून कॉपी केले असल्याचा दावा केला आहेय.

‘आपलं काम अशाप्रकारे कॉपी केलं जात आहे हे पाहणं अतिशय खेदजनक आहे. परंतु गेल्या काही वर्षांत असे अनेकवेळा घडले आहे आणि ते अगदी हास्यास्पद आहे. आम्ही याकडे वाद म्हणून पाहत नाही कारण आम्ही तुमचे लक्ष या प्रकारच्या कामावर केंद्रित करू पाहतो. उत्कृष्ट कंन्टेंट तयार करणं सुरू राहील,’ अशी प्रतिक्रिया त्या ॲनिमेशन स्टुडिओकडून देण्यात आली.

ट्रोलिंगवरओमराऊतांचीप्रतिक्रिया
“लोक टीझर पाहून या चित्रपटाबाबत ज्यापद्धतीनं व्यक्त होतायेत याबाबत मला आश्चर्य वाटलं नाही. उलट मला या गोष्टीचं वाईट वाटलं. हा सिनेमा मी सिल्वर स्क्रिनवर पाहण्यासाठी बनवला आहे, मोबाईलवर पाहण्यासाठी नाही. युट्यूबवर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित न करण्याचा पर्याय जर माझ्याकडे असता तर आज ‘आदिपुरुष’चा टीझर त्यावर प्रदर्शित झालाच नसता. पण सध्या युट्यूब म्हणजे काळाची गरज आहे,”  अशी प्रतिक्रिया ओम राऊत यांनी ट्रोलिंगनंतर दिली होती.

Web Title: south superstar Prabhas starrer Adipurush poster a copy claims animation studio teaser release netizens troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.