'पुष्पा २ : द रूल' या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:26 IST2024-08-05T18:25:44+5:302024-08-05T18:26:38+5:30
Pushpa 2 Movie : 'पुष्पा 2 द रूल'च्या रिलीजच्या तारखेची पुष्टी करताना, निर्मात्यांनी क्लायमॅक्स सीनबद्दल एक मोठे अपडेट शेअर केले आहे.

'पुष्पा २ : द रूल' या दिवशी येणार भेटीला, निर्मात्यांनी सिनेमाच्या क्लायमॅक्स संदर्भात दिली अपडेट
'पुष्पा 2 द रुल' (Pushpa 2 The Rule) हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे, ज्याच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी चित्रपट ऑगस्ट ते डिसेंबर पुढे ढकलला होता, तर रिलीजची तारीख डिसेंबरच्या पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, निर्मात्यांनी याबाबत मौन सोडले नाही. पण आता अल्लू अर्जुनच्या आगामी चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. पुष्पा २ सिनेमा ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्यांनी घोषित केले आहे की क्लायमॅक्सच्या भागाचे शूटिंग सुरू झाले आहे. अल्लू अर्जुन हैदराबादच्या सेटवर हाय-ऑक्टेन ॲक्शन सीनसाठी दिसला होता. पुष्पा २ द रुल हा चित्रपट ६ डिसेंबर, २०२४ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये भेटीला येणार आहे.
पुष्पा २मध्ये दिसणार हे कलाकार
या बहुप्रतिक्षित चित्रपटात फहद फासिल, अनुसया भारद्वाज, सुनील, राव रमेश, जगदीश आणि इतरांसह अनेक प्रभावी कलाकार दिसणार आहेत. देवी श्री प्रसाद यांच्या साउंडट्रॅकसह मैत्री मुव्ही मेकर्सद्वारे निर्मित, चित्रपट खूप उत्साह निर्माण करत आहे. पुष्पा द राइज २०२१ मध्ये रिलीज झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर ३६० ते ३७३ कोटी रुपयांची कमाई केली होती.