'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियर प्रेमात पडली, फोटो पोस्ट करत चाहत्यांसमोर दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 01:11 PM2024-01-09T13:11:05+5:302024-01-09T13:11:48+5:30

प्रिया प्रकाश वॉरियरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

Wink Girl Priya Prakash varrier fell in love confessed to her fans by posting a photo | 'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियर प्रेमात पडली, फोटो पोस्ट करत चाहत्यांसमोर दिली कबुली

'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियर प्रेमात पडली, फोटो पोस्ट करत चाहत्यांसमोर दिली कबुली

'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वॉरियरचा (Priya Prakash Varrier) सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. साऊथ सिनेमातील गाण्यात भुवया उडवून लाखो चाहत्यांना घायाळ करणाऱ्या प्रियाने प्रेमाची कबुली दिली आहे. प्रिया साऊथच नाही तर संपूर्ण भारताची क्रश बनली होती. त्यामुळे प्रिया नक्की कोणाच्या प्रेमाच पडली असेल असा विचार तुम्हीही करत असालय प्रियाने नुकतेच काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.

प्रिया प्रकाश वॉरियरने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती लंडनच्या रस्त्यावरील सुंदर गल्ल्यांमध्ये फिरताना दिसत आहे. ओवर कोट आणि हाय बुट्समध्ये ती सुंदर दिसत आहे. तर तिने केस घट्ट बांधले आहेत. प्रिया या लूकमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. तिने कॅप्शनमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. म्हणजेच तिने कोणा व्यक्तीवर नाही तर लंडन शहराच्या प्रेमात पडल्याचं म्हटलं आहे. तिने कॅप्शनमध्ये 'लव्ह, लंडन' असं लिहिलं आहे. 

प्रियाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळतोय. एका युजरने कमेंट करत विंक करतानाचे GIF बनवले आहे. 'तू सर्वात सुंदर आहेस' असं म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने तिची स्तुती केली आहे. तिच्या या फोटोंना काही तासातच हजारो लाईक्स मिळाले आहेत. प्रियाचे इन्स्टाग्रामवर ७० लाख फॉलोअर्स आहेत.

Web Title: Wink Girl Priya Prakash varrier fell in love confessed to her fans by posting a photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.