अभिनेत्री रुक्मिणीनं प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये थेट दीपिकाची घेतली जागा, आहे शहीद कर्नलची मुलगी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 17:40 IST2025-05-23T17:39:48+5:302025-05-23T17:40:00+5:30
प्रभासचा बहुप्रतिक्षित 'स्पिरिट' हा अॅक्शनपट सध्या चर्चेत आहे.

अभिनेत्री रुक्मिणीनं प्रभासच्या 'स्पिरिट'मध्ये थेट दीपिकाची घेतली जागा, आहे शहीद कर्नलची मुलगी!
सुपस्टार प्रभास आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा बहुप्रतिक्षित 'स्पिरिट' हा अॅक्शनपट सध्या चर्चेत आहे. यामध्ये प्रभाससोबत मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोणला ऑफर देण्यात आली होती. पण, आता संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिकाला बाहेर काढलं आहे. दीपिकाने खूव जास्त मानधन मागितल्याने संदीप रेड्डी वांगा नाराज होते. तसंच तिच्या काही अटीही होत्या. तिच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळेच वांगा यांनी तिला सिनेमातून बाहेर काढलं आहे. दीपिकाची जागा आता एका दुसऱ्या अभिनेत्रीनं घेतली आहे.
संदीप रेड्डी वांगा हे अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिली दीपिकाच्या जागी कास्ट करण्याचा विचारात आहेत. रुक्मिणी ही एक उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिनं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, सिनेमात रुक्मिणीच्या कास्टिगबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
रुक्मिणी वसंतविषयी..
रुक्मिणीचा जन्म १० डिसेंबर १९९६ रोजी बंगळुरूमध्ये झाला. तिचे वडील कर्नल वसंत वेणुगोपाल हे जम्मू-काश्मीरमधील उरी येथे देशासाठी लढताना शहीद झाले होते. त्यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते. रुक्मिणीच्या आई या भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे.
रुक्मिणीने आपले शिक्षण आर्मी स्कूल, एअर फोर्स आणि सेंटर फॉर लर्निंगमध्ये पूर्ण केले आहे. तर अभिनयाचे धडे तिनं लंडनमधून घेतले आहे. सध्या ती २८ वर्षांची असून प्रभासपेक्षा १७ वर्षांनी लहान आहे. तिने काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये कौतुकास्पद काम केले आहे.