रश्मिकाचा हात हातात घेतला, सगळ्यांसमोरच किस केलं अन्...; विजय देवराकोंडाने अखेर कन्फर्म केलं रिलेशनशिप?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 10:36 IST2025-11-13T10:35:59+5:302025-11-13T10:36:16+5:30
काही दिवसांपूर्वीच विजय-रश्मिकाने गुपचूप साखरपुडाही केला. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिक-विजयच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

रश्मिकाचा हात हातात घेतला, सगळ्यांसमोरच किस केलं अन्...; विजय देवराकोंडाने अखेर कन्फर्म केलं रिलेशनशिप?
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा चर्चेत आहेत. रश्मिका आणि विजय लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच विजय-रश्मिकाने गुपचूप साखरपुडाही केला. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. रश्मिक-विजयच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच त्यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्या व्हिडीओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका इव्हेंटमधला हा व्हिडीओ दिसत आहे. या व्हिडीओत रश्मिका आणि विजय दिसत आहेत. विजय देवराकोंडा व्हिडीओत रश्मिकाचा हात हातात घेऊन सगळ्यांसमोरच किस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. रश्मिका आणि विजयने त्यांच्या साखरपुड्याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता त्या दोघांनीही रिलेशनशिप कन्फर्म केलं का, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहून विचारला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून विजय आणि रश्मिका एकमेकांना डेट करत आहेत. पण, त्यांनी त्यांचं रिलेशनशिप ऑफिशियल केलेलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिकाने ३ ऑक्टोबरला साखरपुडा केला. आता फेब्रुवारी महिन्यात ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. २६ फेब्रुवारीला ते लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. उदयपूरमध्ये एका ग्रँड पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चाहतेही रश्मिका-विजयच्या लग्नासाठी आतुर आहेत.