"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:00 IST2025-10-07T09:59:48+5:302025-10-07T10:00:13+5:30

साऊथ स्टार विजय देवराकोंडाच्या गाडीचा सोमवारी(६ ऑक्टोबर) भीषण अपघात झाला. अभिनेत्याच्या कारला मागून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. अपघातानंतर अभिनेत्याने पोस्ट करत तो सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. 

vijay deverakonda accident actor shared post and give health update | "माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट

"माझं डोकं अजूनही ठणकतंय, पण...", अपघातानंतर विजय देवराकोंडाची पोस्ट, चाहत्यांना दिले हेल्थ अपडेट

साऊथ स्टार विजय देवराकोंडाच्या गाडीचा सोमवारी(६ ऑक्टोबर) भीषण अपघात झाला. या अपघतातून विजय देवराकोंडा थोडक्यात बचावला आहे. तेलंगणामधील जोगुलांबा येथील नॅशनल हायवेवर हा अपघात झाला. अभिनेत्याच्या कारला मागून येणाऱ्या एका गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात विजय देवराकोंडाच्या कारचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही. विजय देवराकोंडाच्या गाडीचा अपघात झाल्याने चाहते चिंतेत होते. अपघातानंतर अभिनेत्याने पोस्ट करत तो सुखरूप असल्याची माहिती दिली आहे. 

कार अपघातानंतर विजय देवराकोंडाने X अकाऊंटवरुन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये विजय देवराकोंडाने हेल्थ अपडेट दिले आहेत. "सगळं ठीक आहे...गाडीला धडक दिली, पण आम्ही सगळे ठिक आहोत. त्यानंतर वर्कआउट केलं आणि मग घरी गेलो. माझं डोकं थोडं दुखतंय, पण बिर्याणी आणि झोपही हे ठीक करू शकणार नाही. तुम्हा सगळ्यांना खूप सारं प्रेम...ताण घेऊ नका", असं विजय देवराकोंडाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त करत त्याला काळजी घेण्यास सांगितलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा हा त्याच्या कारमधून पुट्टपर्थी येथून हैदराबाद येथे जात असताना जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील उंडावल्ली येथे त्याच्या कारला दुसऱ्या वाहनाची धडक बसली. हा अपघात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास झाला. या धडकेत विजय देवरकोंडा याच्या कारचं नुकसान झालं आहे. मात्र या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. अपघात झाल्यानंतर विजय देवरकोंडाच्या ड्रायव्हरने स्थानिक पोलिसांना त्वरित माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 

Web Title : कार दुर्घटना के बाद विजय देवरकोंडा सुरक्षित, स्वास्थ्य अपडेट दिया

Web Summary : तेलंगाना में विजय देवरकोंडा की कार दुर्घटनाग्रस्त हो गई। उन्होंने प्रशंसकों को बताया कि वह ठीक हैं, बस सिरदर्द है। बिरयानी और नींद से ठीक हो जाएगा!

Web Title : Vijay Deverakonda safe after car accident, shares health update

Web Summary : Vijay Deverakonda survived a car accident in Telangana. He assured fans he's well, just a headache. Biryani and sleep will fix it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.