विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 05:30 PM2024-06-21T17:30:50+5:302024-06-21T17:31:13+5:30

विजयने आपल्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Tollywood star Vijay Deverakonda lavish and luxurious house in the USA video | विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे

विजय देवरकोंडाचं USA मधील हॉलिडे होम पाहिलं का? लक्झरियस इंटिरिअरने दिपतील डोळे

सर्व बड्या सेलिब्रिटींकडे मुंबईत आलिशान घरे, बंगले आहेत. परंतु काही सेलेब्स देशाच्या प्रमुख ठिकाणी लक्झरी हॉलिडे होम्सचे मालक आहेत. यातलाच एक अभिनेता म्हणजे विजय देवरकोंडा. विजयचं USA मध्ये लक्झरियस घर आहे. विजयने आपल्या इन्स्टा हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याच्या USA मधील हॉलिडे होमची झलक दिसत आहे. 

विजय देवराकोंडाने इंस्टाग्राम अकाउंटवर हार्ट इमोजी आणि 'मेकिंग मेमरीज' या कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट केला. व्हिडीओमध्ये विजयचं घर पाहायला मिळत आहे. या घराला अत्यंत स्टायलिश, लक्झरियस आणि क्लासी लुक देण्यात आला आहे. उंच छप्पर, वुडन वर्क आणि शांत वातावरण असणारे हे घर खूपच मनमोहक आणि आल्हाददायक आहे. या घराच्या बाहेरील भागात निसर्गाच्या सान्निध्यात नितळ निळ्या पाण्याचा स्विमिंग पूल बांधण्यात आला आहे. 

आज विजयकडे अमाप यश, संपत्ती आहे. मात्र, एकेकाळी त्याने प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले. ३० कोटी रुपयांची अमाप संपत्ती असलेल्या या अभिनेत्याकडे चक्क घरभाडं भरायचेही पैसे नव्हते. आज विजय वर्षाकाठी ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो. विजय हैदराबादमधील जुबली हिल्स येथे राहत असून त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. विजय आजही त्याच्या आई-वडील आणि भावासोबत राहतो.

विजय देवरकोंडाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो 'VD12' मध्ये दिसणार आहे. त्यानंतर तो श्याम सिंघा रॉय आणि राहुल सांकृत्यायन यांच्या पीरियड ॲक्शन ड्रामामध्ये झळकणार आहे. विजयने SVC बॅनरखाली रवी किरण कोलासोबत एक चित्रपटही साइन केला आहे.  विजय आज आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

Web Title: Tollywood star Vijay Deverakonda lavish and luxurious house in the USA video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.