अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 14:03 IST2025-05-12T14:02:38+5:302025-05-12T14:03:39+5:30
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळल्याने त्याच्या चाहत्यांना काळजी वाटली आहे. अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

अभिनेता स्टेजवर अचानक बेशुद्ध होऊन कोसळला! तातडीने रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं?
मनोरंजन विश्वातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता विशाल (tamil actor vishal) स्टेजवर अचानक बेशुद्ध झाल्याने अभिनेत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विशाल हा सुप्रसिद्ध तामिळ अभिनेता आहे. विशाल हा तामिळनाडूतील विल्लुपुरम येथील एका कार्यक्रमाला उपस्थित होता. त्यावेळी स्टेजवर गेला असता विशाल अचानक बेशुद्ध झाल्याने सर्वांनाच काळजी वाटली. विशालला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
विशाल बेशुद्ध, आता कशी आहे तब्येत?
तामिळ अभिनेता विशाल हा कूवगम गावात गेला होता. या गावात 'मिस कूवगम २०२५' या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विशाल स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी मंचावर गेला असता अचानक तो बेशुद्ध होऊन कोसळला. त्यामुळे आयोजकांनी विशालला नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर विशाल शुद्धीवर आला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय. यावेळी माजी मंत्री के. पोनमुडीही उपस्थित होते. विशालला योग्य उपचार मिळतील याची खबरदारी त्यांनी घेतली.
विशालची प्रकृती आता स्थिर
विशाल बेशुद्ध झाल्यावर काही तासांनी त्याच्या टीमने याविषयी अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. त्यानुसार असं सांगण्यात आलंय की, विशालला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्या तापातून विशाल बरा झाला. याशिवाय विशालला डेंग्यूही झाला होता. स्टेजवर बेशुद्ध झाल्यावर वेळीच उपचार केले गेल्याने विशालची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली असलेल्या विशालला व्यवस्थित उपचार करुन घरीही सोडण्यात येईल.