'सनरायजर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारन 'या' लोकप्रिय संगीतकारासोबत दिसली, डेटिंग कन्फर्म!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 18:14 IST2025-11-13T18:03:13+5:302025-11-13T18:14:03+5:30
काव्या मारनसोबत लग्न करणार सुप्रसिद्ध गायक?

'सनरायजर्स हैदराबाद'ची मालकीण काव्या मारन 'या' लोकप्रिय संगीतकारासोबत दिसली, डेटिंग कन्फर्म!
लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या आयपीएल संघाची मालकीण काव्या मारन (Kaviya Maran) चर्चेत आले आहे. पुन्हा एकदा काव्या आणि अनिरुद्ध हे एकमेंकाना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. नुकतंच न्यू यॉर्क शहरात हे दोघे एकत्र स्पॉट झालेत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंदर हे न्यू यॉर्क शहरात एकत्र फिरताना दिसले. दोघेही अगदी साध्या लूकमध्ये, अंतर राखून चालताना कॅमेऱ्यात कैद झाले. योगायोग असा की, त्याच वेळी एक यूके व्लॉगर तिथे आपला व्लॉग शूट करत होता आणि त्याच्या व्हिडीओत हे दोघे एकत्र दिसले.
अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांच्या नात्याबद्दल यापूर्वीही अनेकवेळा चर्चा झाली आहे. सनरायझर्स हैदराबादच्या मॅचेसदरम्यान अनिरुद्ध रविचंदर अनेकदा काव्या मारनसोबत दिसला आहे. दोघेही एकमेंकाच्या प्रेमात असून लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. काव्या मारन सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची मुलगी आहे. काव्याने अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि नंतर ती वडिलांच्या बिझनेसमध्ये आली. सध्या ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या कार्यकारी संचालक पदावर आहे.
अनिरुद्ध रविचंदर हा प्रसिद्ध अभिनेते रवी राघवेंद्र यांचा मुलगा आहे. अनिरुद्धने दक्षिण चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वतःचं नाव कमावलं आहे. १६ ऑक्टोबर १९९० रोजी जन्मलेला अनिरुद्ध हा 'Why This Kolaveri Di' या गाण्याने अनिरुद्ध जगभरात प्रसिद्ध झाला होता. तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा संगीतकार आहेत. एका चित्रपटासाठी तो कोटींचं मानधन घेतो. मानधनाच्या बाबतीत त्यानं मोठ्या संगीत दिग्दर्शकांना मागं टाकलं आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात संगीत देण्यासाठी अनिरुद्ध रविचंद यांनी १० कोटी रुपये घेतले होते.