दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलने बांधली लग्नगाठ, इटलीत हिंदू पद्धतीने पार पडला शाही विवाहसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 11:38 AM2023-11-02T11:38:35+5:302023-11-02T11:39:30+5:30

प्रसिद्ध दाक्षिणात्य कपल अडकले विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

south couple varun tej and lavanya tripathi tied knot in italy photos viral | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलने बांधली लग्नगाठ, इटलीत हिंदू पद्धतीने पार पडला शाही विवाहसोहळा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलने बांधली लग्नगाठ, इटलीत हिंदू पद्धतीने पार पडला शाही विवाहसोहळा

मनोरंजनविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्याच महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने आप खासदार राघव चड्ढा यांच्याबरोबर लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता प्रसिद्ध दाक्षिणात्य कपल सात फेरे घेत विवाहबंधनात अडकले आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांनी लग्न केलं आहे. इटलीमध्ये हिंदू पद्धतीने मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. 

वरुण आणि लावण्या यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. आयुष्यातील या खास दिवसासाठी वरुण आणि लावण्याने पारंपरिक पेहराव केला होता. लुंगीमध्ये वरुण राजबिंडा दिसत होता. तर लावण्याने लाल रंगाची साडी नेसून साजशृंगार केला होता. लग्नातील काही खास क्षणांचे फोटो वरुणने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. वरुण आणि लावण्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   

वरुण आणि लावण्याच्या लग्नात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. सुपरस्टार चिरंजीवी, अल्लू अर्जुन, राम चरण वरुण-लावण्याच्या लग्नासाठी उपस्थित होते. वरुण हा चिरंजीवी यांचा भाचा आहे. तर अल्लू अर्जुन आणि राम चरण यांच्याबरोबरच त्याचे कौटुंबिक संबंध आहेत.

Web Title: south couple varun tej and lavanya tripathi tied knot in italy photos viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.