३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:37 IST2025-08-29T16:31:16+5:302025-08-29T16:37:04+5:30
दुप्पट वयाच्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली...

३३ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रीनवर रोमान्स; ट्रोल झाल्याने अभिनेत्री संतापली, म्हणाली...
Malvika Mohnana: प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल यांचा नवा चित्रपट 'हृदयपूर्वम' २८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री माल्विका मोहनन देखील मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री रसिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच लोकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आणि त्यावर चर्चा सुरु झाली. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेत्री माल्विका मोहनला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याचं कारण म्हणजे मोहनलाल आणि तिच्या वयातील अंतर ठरलं आहे.याप्रकरणी आता अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली आहे.
अभिनेत्री मालविका मोहननचं वय ३२ वर्ष आहे. तर मोहनलाल ६५ वर्षांचे आहेत. या दोघांच्या वयामध्ये साधारण ३३ वर्षांचं अंतर याच मुद्द्यावरुन आता हे कलाकार नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. यादरम्यान, 'जिंजर मीडिया एंटरटेनमेंन्ट' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मालविका म्हणाली, "प्रेक्षकांनी चित्रपट पाहूनच त्यावर आपलं मत मांडलं पाहिजे. फक्त ट्रेलर पाहून अशा प्रतिक्रिया देणं बरोबर नाही.कोणत्याही चित्रपटाचं कथानक पूर्णपणे माहित असल्याशिवाय त्यावर बोलू नये. आधी सिनेमा पाहा आणि मग त्याबद्दल आपली मतं मांडा."
यानंतर पुढे चित्रपटाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली, "हा सिनेमा इतर रोमॅन्टिक सिनेमांप्रमाणे नाही. याचं कथानक फार वेगळं आहे. दोन अनोळखी माणसांची आयुष्याच्या एका वळवणार भेट होते. त्यानंतर खऱ्या कहाणीला सुरुवात होते." अशा भावना अभिनेत्रीने व्यक्त केल्या.