'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याने अर्धवट सोडली पत्रकार परिषद, आंदोलनकर्त्यांचा माध्यमांसमोरच राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 08:41 AM2023-09-29T08:41:08+5:302023-09-29T09:18:20+5:30

साऊथ अभिनेत्याच्या पत्रकार परिषदेत आंदोलनकर्त्यांचा राडा

south actor siddharth left press conferrence in middle because of some protestors | 'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याने अर्धवट सोडली पत्रकार परिषद, आंदोलनकर्त्यांचा माध्यमांसमोरच राडा

'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याने अर्धवट सोडली पत्रकार परिषद, आंदोलनकर्त्यांचा माध्यमांसमोरच राडा

googlenewsNext

'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) साऊथमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. त्याच्या आगामी 'चिट्ठा' या सिनेमाची पत्रकार परिषद सुरु असतानाच काही आंदोलकांनी राडा केला. यामुळे त्याला पत्रकार परिषद अर्धवट सोडावी लागली. काल बंगळुरुत अभिनेत्याची पत्रकार परिषद होती. प्रमोशनानिमित्त तो माध्यमांशी संवाद साधत होता. दरम्यान काही आंदोलवकर्त्यांनी हंगामा केल्याने सिद्धार्थ उठून निघून गेला.

पत्रकार परिषदेत राडा करणारे हे आंदोलनकर्ते कावेरी जल विवादावरुन भडकले होते. हे कन्नड समर्थक मध्येच घुसले. कावेरीचा मुद्दा इतका महत्वाचा असताना अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं बेकार आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच अभिनेत्याला 'चिट्ठा' ची प्रेस कॉन्फरन्स अर्धवट सोडावी लागली. अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.

पत्रकार परिषद सुरु असताना सुरुवातील तर सिद्धार्थ काही वेळ हसत तिथेच बसू राहिला. पण जेव्हा परिस्थिती चिघळताना दिसली तेव्हा त्याने तिथून निघून जाणंच योग्य समजलं. त्याने उभं राहून माध्यमांचे हात जोडून आभार मानले आणि तो निघून गेला. 

सिद्धार्थला सर्वच 'रंग दे बसंती'सिनेमामुळे ओळखतात. सध्या तो अभिनेत्री आदिती राव हैदरीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना अनेकदा डेटवर सोबत पाहिलं गेलं आहे.

Web Title: south actor siddharth left press conferrence in middle because of some protestors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.