समंथा रुथ प्रभूने कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरुसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केला 'तो' फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:37 IST2025-10-21T11:36:54+5:302025-10-21T11:37:27+5:30
राजसोबत दिवाळी साजरी केल्याने त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.

समंथा रुथ प्रभूने कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरुसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केला 'तो' फोटो
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या निरागस अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. मात्र गेल्या काही वर्षात ती वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. नागा चैतन्यसोबत घटस्फोट, आजारपण, वडिलांचं निधन यामुळे ती स्क्रीनपासून काही काळ दूर गेली होती. मधल्या काळात तिचा एक सिनेमा आणि सीरिज आली. तर आता समंथा तिच्या नवीन रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक राज निदिमोरुला ती डेट करत असल्याची अनेक दिवसांपासूनच चर्चा आहे. आता तिने राजसोबत दिवाळी साजरी केल्याने या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.
राज आणि डीके हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. दोघांनी 'सिटाडेल हनी बनी' ,'द फॅमिली मॅन' या सुपरहिट सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 'सिटाडेल'मध्ये समंथाची भूमिका होती. तेव्हापासूनच राज आणि समंथाच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. विशेष म्हणजे राजचा २०२२ मध्ये पत्नी श्यामलीसोबत घटस्फोट झाला आहे. तर आता समंथाने राजसोबत दिवाळीही साजरी केली. तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती राजसोबत दिसत आहे. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये समंथा सुंदर दिसत आहे. कधी रांगोळी काढताना, कधी फटाके उडवताना ती दिसत आहे. तर एका फोटोत राज आणि त्याच्या कुटुंबासोबत ती बसली आहे.
समंथासोबतच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान राजची एक्स वाईफ श्यामलीने अनेकदा सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर केल्या. समंथाचे चाहते मात्र तिला पाठिंबा देताना दिसत आहेत. 'हॅपी दिवाळी, तुझ्या आयुष्यात सुंदर प्रकाश येवो','प्रत्येकाला खूश राहण्याचा, प्रेमाचा अधिकार आहे' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
समंथा राज आणि डीकेसोबत आगामी 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम'मध्ये काम करत आहे. ही एक अॅक्शन फँटसी वेबसीरिज असणार आहे. दिग्दर्शक राही बर्वे याचं दिग्दर्शन करत आहेत. सीरिजमध्ये समंथासोबत आदित्य रॉय कपूर, अली फजल, वामिका गब्बी, जयदीप अहलावत हे कलाकारही आहेत.