ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर-१' सिनेमात मोठी चूक, बघून डोक्याला हात लावाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 12:38 IST2025-10-13T12:37:24+5:302025-10-13T12:38:00+5:30
ही चूक कळताच तुम्ही डोक्याला हात लावला. एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी गफलत कशी झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर-१' सिनेमात मोठी चूक, बघून डोक्याला हात लावाल!
ब्लॉकबस्टर चित्रपट 'कांतारा' चा प्रीक्वल 'कांतारा चॅप्टर-१' सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'कांतारा' या सुपरहिट सिनेमाचा 'कांतारा: चॅप्टर १' हा प्रीक्वल आहे. 'कांतारा'च्या नंतर प्रेक्षक 'कांतारा: चॅप्टर १'च्या प्रतिक्षेत होते. सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुंवा उडवला आहे. सगळीकडे या कौतुक होत असताना आता चित्रपटातील एक मोठी चूक प्रेक्षकांच्या नजरेस पडली आहे. ही चूक कळताच तुम्ही डोक्याला हात लावला. एवढ्या मोठ्या चित्रपटात अशी गफलत कशी झाली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
खरं तर ऋषभ शेट्टीनं 'कांतारा चॅप्टर-१'साठी मोठी मेहनत घेतली. अगदी बारीक गोष्टींचा अभ्यास करुन चित्रपटाचं शुटिंग झालं. मात्र, इतकी काळजी घेऊनही चित्रपटाच्या एका महत्त्वपूर्ण दृश्यात एक मोठी आणि ऐतिहासिक चूक झाली आहे. ऋषभ शेट्टीकडून 'ब्रह्मकलश' गाण्यात मोठी चूक झाली आहे. 'ब्रह्मकलश' या गाण्यात दिसतं की, उत्सवात गावकरी केळाच्या पानांवर जेवण करत आहेत. उत्सव सुरू आहे. पण, एका कोपऱ्यात एक मोठी प्लास्टिकची पाण्याची बाटली स्पष्टपणे दिसत आहे. 'कांतारा चॅप्टर-१' ची कथा ही चौथ्या शतकातील आहे. प्लास्टिकचा शोध हा २० व्या शतकात लागला. त्यामुळे त्या काळात प्लास्टिकची पाण्याची बाटली असणे किंवा वापरली जाणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे ही एक ऐतिहासिक असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत.
#KantaraChapter1
— rio raz🖤 (@razworldd) October 11, 2025
Mistake shot plastic water can video song 3:06 pic.twitter.com/xLVIiQcgwR
गेम ऑफ थ्रोन्स'शी तुलना
'कांतारा चॅप्टर-१' सारख्या भव्य चित्रपटात अशा चुकीची अपेक्षा नव्हती, त्यामुळे नेटिझन्सनी सोशल मीडियावर या चुकीची खूप चर्चा सुरू केली आहे. अनेकांनी या चुकीची तुलना २०१९ मध्ये जगप्रसिद्ध हॉलिवूड सीरिज 'गेम ऑफ थ्रोन्स' (Game of Thrones) मध्ये झालेल्या मोठ्या चुकीशी केली आहे. 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या एका भागात अचानक मध्ययुगीन सेटवर स्टारबक्सचा कॉफी कप दिसला होता, ज्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. 'कांतारा चॅप्टर-१' मधील प्लास्टिकच्या बाटलीची चूक त्याच श्रेणीतील मानली जात आहे.
दरम्यान, 'कांतारा: चॅप्टर १' सिनेमा कन्नडसह हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीने केलं आहे. दसऱ्याच्या मुहुर्तावर 'कांतारा: चॅप्टर १' प्रदर्शित करण्यात आला. पण पहिल्या दिवसापासूनच सिनेमा बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. या सिनेमात ऋषभ शेट्टीसोबत रुक्मणि वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.