गोल्ड स्मगलिंग ते ग्लॅमरस कास्ट, रजनीकांत यांचा 'कूली' चर्चेत; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:50 IST2025-05-07T11:23:49+5:302025-05-07T11:50:23+5:30
रजनीकांतच्या 'कूली'त आमिर खानचा झक्कास ट्विस्ट!

गोल्ड स्मगलिंग ते ग्लॅमरस कास्ट, रजनीकांत यांचा 'कूली' चर्चेत; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एक जबरदस्त अॅक्शन अवतारात प्रेक्षकांची मनं जिंकण्यास सज्ज झाले आहेत. रजनीकांत यांचा एका सुपरहिट सिनेमा येत आहे. या सिनेमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. तो पाहूनच चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. या चित्रपटाचं नाव 'कूली' असं आहे. या प्रोमोमध्ये रजनीकांतसोबत नागार्जुन अक्किनेनी, उपेंद्र राव, सौबिन शाहिर आणि सत्यराज यांची झलक देखील दिसते. अनिरुद्ध रविचंदर यांचे पार्श्वसंगीत आणि रजनीकांतची स्टाईल यामुळे प्रोमोला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
'कूली' ही रजनीकांत यांची १७वी फिल्म आहे, ज्यात ते 'देवा' या पात्रात दिसतील. हा चित्रपट सोन्याच्या तस्करीवर आधारित आहे. या चित्रपटात श्रुती हासन, रेबा मोनिका जॉन, आणि पूजा हेगडे एका विशेष डान्स नंबरमध्ये झळकणार आहेत. याशिवाय बॉलिवूड स्टार आमिर खान यांचा कॅमिओ रोल फॅन्ससाठी मोठा सरप्राइज ठरेल. हा चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड भाषांमध्ये एकत्र प्रदर्शित होणार आहे. गिरीश गंगाधरन यांच्या सिनेमॅटोग्राफीमुळे चित्रपटाला एक भव्यदिव्य लुक मिळाला आहे. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट १४ ऑगस्ट २०१५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोशल मीडियावर ट्रेंडिंग
प्रोमो रिलीज झाल्यापासून #CoolieIn100Days हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. रजनीकांत यांना साऊथ सिनेमाचा देव म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी चेन्नईत मंदिरही बांधले आहे हे खरे आहे. रजनीकांतच्या स्टारडमचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, इंस्टाग्रामवर त्यांची फक्त एक पोस्ट आहे. परंतु, त्यांचे फॉलोअर्स १.२ दशलक्ष आहेत. रजनीकांत यांनी तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक चित्रपट केले आहेत.