बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि रजनीकांत यांची 'ग्रेट-भेट', शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 17:48 IST2024-12-26T17:45:01+5:302024-12-26T17:48:14+5:30
सध्या जगभरात एका तरुणाची प्रचंड चर्चा आहे. तो म्हणजे विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेश.

बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश आणि रजनीकांत यांची 'ग्रेट-भेट', शेअर केली खास पोस्ट
सध्या जगभरात एका तरुणाची प्रचंड चर्चा आहे. तो म्हणजे विश्वविजेता ग्रँडमास्टर डी. गुकेश (D Gukesh). अवघ्या १८ वर्षांच्या गुकेशने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंगापूर येथे झालेल्या रोमहर्षक फायनलमध्ये चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता होण्याचा मान मिळवला आहे. १८वा विश्वविजेता म्हणून गुकेशचे नाव बुद्धिबळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेलं आहे.
भारतात 11 वर्षांनंतर बुद्धिबळ चॅम्पियनशिप परत आणणाऱ्या गुकेश आणि त्याच्या पालकांनी चेन्नईमध्ये सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली. गुकेशने त्याच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तो रजनीकांतसोबत उभा आहे. त्यानं लिहिलं, "सुपरस्टार रजनीकांत सर, तुमच्या शुभेच्छा आणि वेळेबद्दल धन्यवाद. तुमच्यासोबत घालवलेला वेळ आणि तुमचा सल्ला आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे".
Thanks Superstar @rajinikanth sir for your warm wishes and inviting ,spending time and sharing your wisdom with us 🙏 pic.twitter.com/l53dBCVVJH
— Gukesh D (@DGukesh) December 26, 2024
रजनीकांत यांच्याशिवाय, गुकेशनं 'अमरन' स्टार शिवकार्तिकेयनचीही भेट घेतली. अभिनेत्याने त्याला एक आलिशान घड्याळ भेट दिलं आहे. गुकेशने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "शिवकार्तिकेयन सरांसोबत खूप छान वेळ घालवला. इतके व्यस्त असूनही त्यांनी आमच्यासोबत वेळ घालवला". बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर गुकेशला अमिताभ बच्चन, मोहनलाल, महेश बाबू यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या स्टार्सकडून शुभेच्छा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याचे अभिनंदन केले होते.
Had a great time with @Siva_Kartikeyan sir and he was kind enough to spend time with me and my family despite his busy schedule and enjoyed a lot! pic.twitter.com/GnnGx3wDs4
— Gukesh D (@DGukesh) December 26, 2024